अमळनेरला सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शन ने आणली रंगत
अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. प्राचार्य गायत्री भदाने अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, ज्येष्ठ शिक्षक व्ही सी पाटील, लता पवार, दीपककुमार पाटील आदी उपस्थित होते. गणित शिक्षक जी पी हडपे यांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या गणितीय सूत्रांवर पोस्टर तयार करून घेतले. त्यांनी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळावा यासाठी मनोरंजनाच्या माध्यमातून व्यवहारिक जीवनातील गणित प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम उमेश काटे व जी पी हडपे यांनी घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेले पोस्टरचे अनावरण करून प्रदर्शन भरवण्यात आले. गायत्री भदाणे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.