1 min read

लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश,
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी प्रतिभाताई शिंदे यांचे पक्षात केले स्वागत…

Loading

लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी प्रतिभाताई शिंदे यांचे पक्षात केले स्वागत…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपल्या लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे समाजसेवेसाठी एक समर्पित जीवन या समर्पणातून सातपुड्यातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले ते कष्ट घेत असताना संघटन मजबूत केले त्या संघटनेच्या मजबुती करण्याच्या प्रवासाने प्रतिभाताईंचे इरादे अधिक भक्कम झाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक पंचवार्षिक योजनेत भारत सरकारने विविध प्रांत भाषा भौगोलिक रचना आर्थिक सामाजिक शैक्षणिक सारे स्तर अतिशय तळागाळातील दुर्लक्षित वंचित पीडित नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्या प्रयत्नात आमचा आदिवासी बांधव सतत दुर्लक्षित राहिला त्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा खूप मोठा निर्णय भारतीय संसदेच्या पटलावर आपल्या युक्तीने बुद्धीने शक्तीने मांडून वर्षानुवर्ष भांडून माझा आदिवासी बांधव सुखी समाधानी व संपन्न करण्याचा वसा जो घेतला होता तो पूर्णत्वास नेत असताना नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचे मंत्रिमंडळ त्याच सोबत भारत सरकारचे मंत्रिमंडळ व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत सतत अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना ताईंच्या नेतृत्वाला प्रामाणिकपणाची धार आली आणि ती धार समाज हिताची महिलांच्या सशक्ति करण्याची युवकांच्या प्रश्नांना प्रमुख स्थानी ठेवणारी व राजकीय जडणघडणीत गांधीवाद समाजवाद व राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून साने गुरुजींचा आंतरभारतीचा विचार मनामध्ये साठविणारी ही अतिशय प्रखर शक्तिशाली राष्ट्रीय नेता म्हणून 2014 नंतर अधिक प्रकाश झोतात आली आणि त्या अनुषंगाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदीर्घ प्रवासात होऊ घातलेले संभाव्य बदल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी करण्याचे ठरविले असताना त्यांच्या नजरेतून राष्ट्रीय पातळीवरील एवढा प्रखर नेता दुर्लक्षित होईल असे शक्य नाही मागील अनेक वर्षांपासून प्रतिभाताई शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी वदंता होती मात्र त्याला मूर्त रूप आज राहुलजी गांधी यांनी प्रतिभाताई यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा तिरंगी सुताचा मफलर टाकून शिक्का मोर्तब केले आता ताईंच्या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अधिक बळकट होताना विविध आंदोलनाची दिशा ताईंच्या प्रदीर्घ अनुभवातून ठरविले जाईल आंदोलनांना मूर्त रूप देताना ज्यांच्यासाठी आंदोलन करायचे त्या साऱ्यांना सोबत घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे मात्र कायद्याच्या चौकटीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी देखील घ्यायची व शासन प्रशासनाला आपल्या नेमणुका या जनतेचा सेवक म्हणून झालेल्या आहेत याचा विसर पडू नये अशी देखील त्या काळजी घेतात आणि म्हणूनच प्रशासनातील अधिकारी देखील प्रतिभाताई च्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देतात कोणताही राजकीय पक्षातील नेता हा ताईंना अतिशय सन्मानाची वागणूक देत असताना याची जाणीव ठेवतो की राजकारण राजकारणाच्या जागेवर व समाजकारण हेच खरे सेवेचे माध्यम आहे आणि त्यामुळे मागील तीस वर्षातील विविध अनुभवांचा फायदा ताईंचे नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरेल आज जागतिक स्पर्धेच्या युगात देश पातळीवरील सरकारी व राज्य सरकारे यांचा समतोल ढळत असताना ताई यामध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन राज्य व केंद्र सरकार आतील तू तू मैं मैं जी होताना दिसते त्यावरही जालीम तोडगा काढतील असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भरून राहिला आहे अतिशय सामान्य घरातील ही लेक शिक्षण घेत असतानाच चळवळीमध्ये झोकून देऊन काम करू लागली मेघाताई पाटकर जे यू नाना ठाकरे माजी आमदार गुलाबराव पाटील ना ग गोरे एस एम जोशी राष्ट्रसेवा दलातील निळू फुले श्रीराम लागू नरेंद्र दाभोळकर शेखर सोनाळकर यासह अनेक चळवळतील कार्यकर्ते ज्यांच्या सोबत काम करताना कोणाशीही वैयक्तिक हेवा दावा नाही श्रेयवादासाठीचा संघर्ष नाही आपल्या कामातील सातत्य हेच प्रतिभाताईला समाजातील अतिशय प्रामाणिक निष्ठावंत सैनिक म्हणून समाजात मानाचे स्थान मिळवून देते अशा प्रतिभाताई शिंदे या स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेशित झाल्या यामुळे त्यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत सामाजिक चळवळीत आपले योगदान देऊन त्या आता राजकीय चळवळीत देखील अधिकाधिक योगदान देतील ही अपेक्षा असे काग्रेस पक्षाचे समन्वयक संदीप घोरपडे अमळनेर यांनी व्यक्त केली आहे..
अ.भा.काँग्रेस पक्षात प्रतिभाताई शिंदे यांनी प्रवेश केल्याबद्दल यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *