1 min read

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान
पुणे: तीन दशकाहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने, निरपेक्षपणे निरंतर निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक, ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातव्या इंटरनॅशनल हुमनराईट्स डे दिनाचे औचित्य साधून गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष मनीष जी शर्मा यांनी वरील पुरस्कार डॉ.रवींद्र भोळे यांना प्रदान केला. डॉक्टर रवींद्र भोळे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते प्रवचनाद्वारे प्रबोधन व्यसनमुक्तीचे कार्यही करीत आहेत. अंध अपंग मूकबधिर मतिमंद संस्थांमध्ये ते कार्यरत असून अपंगांची दिव्यांगांची सेवा करीत आहेत. मराठवाडा भूकंप उरुळी कांचन गॅस्ट्रो साथ, पुरंदर तालुक्यात पूर्व भागामध्ये दुष्काळग्रस्त क्षेत्रात वैद्यकीय सेवा, पद्मश्री मनीबाई देसाई माणूस वॉटर प्रतिष्ठानच्या वतीने वीर क्षेत्रात त्यांनी कार्य केलेला आहे. आणि हृदय फिरताना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. राज्यभर अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या कार्याबद्दल मॅगसेस शिवाय विजेते पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई यांनी गौरव पत्र देऊन सन्मान केलेला आहे. डॉ.रवींद्र भोळे उरुळी कांचन येथे डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र द्वारे अत्यल्प दरात वैद्यकीय धर्मदाय सेवा देत आहेत. आणि गरीब लोकांना ते विविध हॉस्पिटल मधून सहकार्य मिळवून देत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील लोकसेवक लेखक भास्कर भोसले यांनी’ वाळवंटातील समाजसेवी सरोवर ‘हे पुस्तक डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित केलेले आहेत. डॉ.रवींद्र भोळे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय बाळासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुणे येथे झाले आहे. डॉ. रवींद्र भोळे यांना पद्मश्री डॉक्टर मणी देसाई,मोहन धारिया ,बाळासाहेब भारदे, मधुकरराव चौधरी, बानू कोयजी, महात्मा गांधीजींच्या स्नुषा निर्मला बेन गांधी ,नागपूर येथील स्व मग झिटे, पद्मश्री व्ही भी कोलते, अशा महा न कृषीतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते डॉ.रवींद्र भोळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्याबरोबरही त्यांचा कार्य सहभाग असुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात त्यांनी कार्य केलेले आहे.त्यांना आतापर्यंत 470 नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट, अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांना अनेक मल्टिपल वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे हे पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान, डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निळकंठेश्वर भुलेश्वर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे सरस्वती प्राथमिक शाळा उरुळी कांचन या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे सरदार पटेल लेवा पाटील समाज मंडळ उरुळी कांचन ,राष्ट्रीय एल्पीसमाज फाउंडेशन ,रवींद्र शांतिनिकेतन ग्रंथालय ,अहिल्या सार्वजनिक ग्रंथालय इत्यादी संस्थांमध्ये संस्थापक म्हणून कार्य केलेले आहे. डॉ.रवींद्र भोळे महावीर मूकबधिर निवासी विद्यालय उरुळी कांचन, महावीर मतिमंद निवासी विद्यालय ,संत गजानन मतिमंद विद्यालय ,सेवाधाम निवासी मतिमंद विद्यालय ,गोयल मतिमंद निवासी विद्यालय, ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यालय, छत्रपती निवासी मतिमंद विद्यालय ,मतिमंद विद्यालय कोल्हापूर पी एन पाटील मलोवी मंच कोल्हापूर ,हिंदुस्थान आश्रम शाळा अ नगर, क्रांतीज्योत महात्मा फुले बालकाश्रम भांडगाव अनगर ,श्री सेवा बालकाश्रम वर्धा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय वर्धा ,शारदा मूकबधिर विद्यालय वर्धा ,संत यादव बाबा हायस्कूल शिंदवणे, भारतीय प्रौढ शिक्षण संस्था दिल्ली या संस्थांमध्ये कार्य करीत असून संस्थांचे सल्लागार सदस्य आहेत. डॉ. रविंद्र भोळे हे सामाजिक न्यायाची ऊर्जा स्तोत्र व शांती सेनेचे पुरस्कार आहेत. ते महाराष्ट्र महाराष्ट्रात नामांकित समाजसेवक आहेत समाज प्रबोधनकार आहेत प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत अपंग सेवक आहेत वृक्षमित्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *