स्वच्छ भारत मिशन (SBM) चे प्रशिक्षण घेऊन गावात अमलबजावणी करावी – गट विकास अधिकारी सुशांत पाटील
![]()

स्वच्छ भारत मिशन (SBM) चे प्रशिक्षण घेऊन गावात अमलबजावणी करावी – गट विकास अधिकारी मा श्री सुशांत पाटील
मा. अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात केआरसी म्हणून अमळनेर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधून सरपंच, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट सीआरपी, स्वच्छता गृही यांना सादर प्रशिक्षण देण्यात येत आहे. आजचे प्रशिक्षण बॅच क्रमांक 2 प्रशिक्षण कार्यक्रम समारोप प्रसंगी मा.श्री श्याम अहिरे प्रमुख पाहुणे तसेच मा.श्री. हिरालाल पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर मा.श्री.सुशांत पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर मा.श्री.सुरेश कठाले विस्तार अधिकारी पंचायत समिती अमळनेर मा. श्री.मनोहर मोरे, मा.श्री. पांडुरंग कांबळे सीआरसी पंचायत समिती अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली दुसर्या बॅचचे प्रशिक्षण समारोप पार पडला सदर बॅच मध्ये 12 गावांचा समावेश होता.
मा. श्री.सुशांत पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांनी स्वच्छ भारत मिशन प्रशिक्षण ( SBM ) चे प्रशिक्षण घेऊन झाल्यावर गावात याची अमलबजावणी करावी म्हणजे आपण प्रत्येकाने गावात प्रत्येक वार्ड निहाय स्वच्छता संदर्भात बैठका घेऊन त्या संदर्भात जनजागृती करावी म्हणजे आपले गाव कसे स्वच्छ करता येईल व वैयक्तिक स्वच्छता कशी करता येईल या संदर्भात प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या गावात बैठका घेऊन स्वच्छ भारत मिशन चे मार्गदर्शन करावे असे सांगितले तसेच मा.श्री श्याम अहिरे माजी सभापती पंचायत समिती अमळनेर यांनी गावाचा जर विकास करायचा असेल तर सरपंच व ग्रामसेवक यांच्या शिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी देखील राजकारण नकरता त्यांना सहकार्य करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तरच गावाचा विकास होईल असे सांगितले तसेच मा श्री हिरालाल पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन प्रशिक्षण घेऊन एक मोठी चळवळ निर्माण करून तालुका स्वच्छ करण्यासाठी या प्रशिक्षणाची खुप गरज आहे असे सांगितले सदर प्रशिक्षणात अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येत आहे तसेच मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण पुस्तिका प्रशिक्षणार्थी यांना वितरण करण्यात आले.
सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव अंकित साहेब, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जळगाव मा. श्री. भारत कोसोदे गटविकास अधिकारी अमळनेर सुशांत पाटील, क्षमता बांधणी तंज्ञ मनोहर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास संस्थेमार्फत सदर प्रशिक्षण घेण्यात येत आहे या प्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी तंज्ञ प्रशिक्षक दिनेश पाटील, सुशील केदारे, राष्ट्रविकास संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील या दरम्यान प्रशिक्षण देत आहेत या वेळेस संस्थेचे प्रतिनिधी नयना चौधरी,महेश माकडे, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, सीमा महाजन, राहुल सूर्यवंशी, भाग्यश्री गोसावी हे सदर प्रशिक्षणाचे नियोजन करीत आहे.

