1 min read

कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारा प्रतापच्या ५६ विद्यार्थ्यांची निवड,कंपनीने दिले रुजू पत्र

Loading

कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारा प्रतापच्या ५६ विद्यार्थ्यांची निवड,कंपनीकडून त्वरित रुजू पत्र देण्यात आले.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- खा. शि. मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि. २४ डिसेंबर रोजी डाटा मॅटीक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी नाशिक, वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशाळा आणि ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यात ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८१ विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना त्वरित कंपनीकडून रुजू पत्र देण्यात आले. कंपनी कडून मुलाखत घेण्यासाठी कपंनीचे वरिष्ठ एच. आर. मॅनेजर कमलेश चिचे व त्यांची निवड समिती आलेली होती.
एकूण ५६ विद्यार्थ्यांची निवड होणे ही अतिशय कौतुकाची बाब ठरली आहे. मुलाखतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे खा. शि. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्थ कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, सचिव व प्राचार्य प्रा. डॉ अरुण जैन, सहसचिव प्रा. डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.एच.निकुंभ, प्रा.डॉ. कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा.डॉ.विजय मांटे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख प्रा. डॉ योगेश तोरवणे, प्रा. डॉ तुषार रजाळे (ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल), व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *