1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व अंशता अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पिडीत कर्मचा-यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लावला मार्गी
![]()
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व अंशता अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पिडीत कर्मचा-यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लावला मार्गी
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री, विरोधीपक्ष नेते, शिक्षक व पदवीधर आमदार यांचे मानले आभार





हा तर संघटनेच्या व कर्मचाऱ्यांचा एकजुटीचा विजय
संगीताताई शिंदे
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना प्रतिनिधींची आज दुपारी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
१) चर्चेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी टप्पा अनुदानवर असलेल्या व २००५ नंतर १००% अनुदान आलेल्या २६००० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.
२) २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना आलेल्या अहवालाचा अभ्यास करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
३) १०-२०-३० बाबत शिक्षण विभागास निर्देश येतील. तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने आजपासून सुरू असलेला संप स्थागित करण्यात आला आहे.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील 26000 पेंशन पिडीत कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली .शेवटी संगीताताई शिंदे व शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या प्रयत्नांना यश आले .कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा हा आज विजय आहे असे अध्यक्ष संगीताताई शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या व शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याच्या अध्यक्ष संगीता ताई शिंदे ,
महेंद्र हिंगे सचिव ,प्राध्यापक दिलीप डोंगरे
सरचिटणीस ,संभाजी पाटील सर चाळीसगाव नाशिक विभाग , अमळनेर पेन्शन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील,, प्रसिध्दी प्रमुख ईश्वर महाजन अमळनेर व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व
शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी व शिक्षण संघर्ष संघटना जळगाव जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री, व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार,माजी आमदार व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे धन्यवाद व्यक्त केले.

