ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेळाव्याला उपस्थित रहावे – डॉ.यशवंत सोरे
![]()



ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेळाव्याला उपस्थित रहावे – डॉ.यशवंत सोरे
भिवंडी दि. ११.(स्व.रा.तो) ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा यांच्यावतीने ओबीसी निर्धार महामेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १७/१२/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता ग्रामपंचायत सोनाळे क्रीडांगण
आगरी महोत्सव मैदान ठाणे नाशिक बायपास येथे करण्यात आले आहे,ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी मेलाव्याळा उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.यशवंत महादू सोरे यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त ओबीसी नागरिकांना केले आहे. कारण हा मेळावा आपल्या ओबीसी समाजाला बल देणारा असेल तसेच आपल्याला स्वतःचे नेतृत्व निर्माण करायचे असेल तर आपला ओबीसी समाज एकत्र झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या ताकतीची जाणीव इतर समाजाला होईल विशेष म्हणजे राज्य सरकारला
होईल, एक ओबीसी विचार समाजामध्ये विचारधारा निर्माण करू शकतो याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. स्वातंत्र्यापासून आपण कोण? कुठल्या प्रवर्गातील आहोत हाच विचार मुली आपण केला नाही व त्याची आवश्यकता पण कधी वाटली नाही. मग ही आवश्यकता आजच का वाटते असा प्रश्न निर्माण झाला आहे, आज आपल्याला संघटित व्हावे असे का वाटत आहे, राजकीय, प्रशासकीय सेवा, नोकर भरती, शिक्षण यामध्ये ओबीसी वर अन्याय होतो आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सर्व समाजाचे संघटन झाले आहे, मग ओबीसीचे संघटन का करू नये, गेल्या अनेक वर्षापासून बुद्धिजीवी समजल्या जाणाऱ्या राजकीय नेत्यांनी फक्त ओबीसी समाजाचा वापर केला, करून घेतला. आपल्या समाजाचे संघटन होऊ दिले नाही, ओबीसी जनगणना होऊ दिली नाही, निवडणुकांमध्ये जातीयवाद व ओबीसी मध्ये फुट पाडून अविश्वास निर्माण करून समाजाचे विभाजन केले, मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे खच्चीकरण केले, त्यांचे पाय ओढून त्यांना मागे केले, तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या व नंतर नोकरीच्या भवितव्यासाठी ओबीसी आरक्षणाची फार गरज आहे जेणेकरून मुलांचे भवितव्य उज्वल होऊ शकेल, म्हणून आता एकच निर्धार ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो, व या देशाचा राजा हो! म्हणून सर्व समाज बांधवांनी आपल्या समाजासाठी संघटित व्हा आरक्षणामुळे झालेला तिढा पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ओबीसी निर्धार महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी निर्धार महामेळाव्याचे अध्यक्ष श्री दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष डॉ.श्री.यशवंत महादू सोरे यांनी आमचे मुंबई ठाणे प्रतिनिधी मनिलाल शिंपी यांचा माध्यमातून समस्त ओबीसी समाजाला आवाहन केले आहे.

