1 min read

पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित…

Loading

युवा उदयोजक भिकेश पाटील सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर पंचायत समितीचे उपसभापती व भाजपचे जिल्हा सरचिटणीस व युवा उद्योजक भिकेशभाऊ पावबा पाटील यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.. तळागाळातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात दिला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांनी अनेक झाडे जगवलेली आहेत व एक घर, एक झाड हा उपक्रम राबवून तो यशस्वी केला आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी अनेक पद भूषवलेली आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांना “सत्कार कर्तुत्वान व्यक्तीचा” या कार्यक्रमात त्यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार घोषित झाला होता पण ते काही कारणास्तव बाहेरगावी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही.. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना सन्मानपत्र ,शिल्ड शाल पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार ईश्वर महाजन, सोपान भवरे, संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अमोल माळी सह अनेक मान्यवर उपस्थित होते…

चौकट
मराठी लाईव्ह न्यूज ने माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत माझी पुरस्कारासाठी निवड करत मला माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत घरी येऊन पुरस्काराने सन्मानित केले मी मनापासून आभार व्यक्त करतो.मला पुरस्काराने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल..

श्री भिकेश पावबा पाटील
मा.उपसभापती-पंचायत समिती अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *