अमळगांव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख यांचा अनोखा उपक्रम
![]()


बी. डी. देशमुख सरांचा अनोखा छंद….
अमळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख सर हे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना घरीच शाळू मातीचा वापर करून गणपती बाप्पाची मुर्ती बनवितात. बाप्पाच्या आकर्षक सजावटीसाठी तत्कालीन परिस्थितीवर आधारित डेकोरेशन करतात. इंजेक्शनच्या लहान, मध्यम व मोठ्या बाटल्यांचा वापर करून देवालय बनविणे . नारळाच्या करवंटी पासून वेगवेगळ्या आकर्षक आकारांची निर्मिती करणे. यासह रद्दी वह्या, पुस्तके, कागद, वर्तमानपत्रापासून विविध अशा आकर्षक, आखीव-रेखीव कलाकृतीही सर बनवित असतात. हे बनविताना सर पर्यावरण रक्षण कसे करावे याचा संदेश देतात. या कलाकृतीतून विशिष्ट असे देखावे तयार करून सर त्याची इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत अतिशय रंजक पध्दतीने पोहचवितात. यावर्षी देखील सरांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रातील एका बेटावर बांधलेला जंजिरा जलदुर्ग किल्ला साकारलेला आहे. या संपूर्ण किल्ल्याचा देखावा त्यांनी तयार केला असून हा देखावा तयार करताना त्यांना त्यांच्या सौभाग्यवती स्मिता देशमुख यांच्यासह मुलगा आशिष, मुली आरती व नेहा, सुनबाई श्रुती देशमुख,रक्षिका जोशी,नमिता वाबळे व नवलभाऊ या सर्वांची या कामी मदत झाली आहे. संपूर्ण देशमुख परिवारातील सदस्य हे अशा पद्धतीने टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक देखावे, प्रतिकृती,वस्तू बनवून आपला आगळ्यावेगळ्या छंदाची परपंरा टिकवून या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत . सरांनी बनविलेल्या जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती …. सर सद्या वास्तव्य करीत असलेल्या जळगाव येथील रायसोनी नगर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहता येईल…

