1 min read

एल वॉर्ड च्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Loading

एल वॉर्ड च्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

आजच्या आधुनिक व डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी मुंबईतील तिन्ही शिक्षण विभागाच्या झोन मधून वॉर्ड स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी दिनांक १२ ते १४ डिसेंबर मुंबईतील एल वॉर्डच्या वतीने हे तीन दिवसीय प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर हायस्कूल येथे सकाळी दहा ते पाच यावेळेत संपन्न होणार असून याचे उद्घाटन सुनील कर्वे, सोनल साटेलकर, अतुल मोडक, डॉ मथुरी रेगे, सुहास शिरोडकर आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.यंदा प्रदर्शनात समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील मॉडेल्स ठेवण्यात येणार आहेत.जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन एल वॉर्ड च्या कन्व्हेनर विद्या फालके आणि गांधी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *