1 min read

डि.आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट

Loading

डी आर कन्या शाळेतील विद्यार्थिनी स्काऊट गाईड च्या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट

अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रोपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेतील स्काऊट गाईड विभागाच्या पंधरा विद्यार्थिनी राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या आहेत. या विद्यार्थिनीं साठी स्काऊट गाईड विभागाच्या प्रमुख गाईड कॅप्टन श्रीमती योगेश्री पाटील व गाईड कॅप्टन श्रीमती नीता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.या सर्व उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सूर्यवंशी मॅडम यांनी देखील परवानगी दिली तसेच सहकार्य केले. या विद्यार्थिनींचे पारोळा देवगाव येथे पूर्व चाचणी शिबिर झाले . या शिबिरात स्काऊट विभागाचे जिल्हा संघटक श्री.बेलोंनकर सर व गाईड विभागाच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच पारोळा देवगाव हायस्कूलचे स्काऊट मास्तर श्री मिस्तरी सर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्काऊट गाईड विभागाची राज्य पुरस्कार ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यापुढील राष्ट्रपती पुरस्कार ही परीक्षा देता येते . या परीक्षेचे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये दहा गुण ग्राह्य असतात. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी केंद्र सरकारच्या कुठल्याही परीक्षांमध्ये स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा असतात तसेच स्काऊट गाईड मुळे विद्यार्थ्यांना चार भिंती बाहेरील शिक्षण घेता येते. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहणे, प्रथमोपचार करणे,गाठी बांधणे,बंधने बांधणे, बिना भांड्यांचा स्वयंपाक करणे ,इतरांना सहकार्य करणे, निसर्गावर प्रेम करणे यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *