1 min read

मैत्रीचा न संपणारा झरा मा. डिगंबर महाले सर!!

Loading

मैत्रीचा न संपणारा झरा मा. डिगंबर महाले सर!!

आदरणीय जेष्ट पत्रकार डिगंबर महाले सर नमस्कार…
कर्तबगार व्यक्तिमत्त्वास विचारपुष्पाने अभिष्टचिंतन
प्रति,
मा. श्री डिगंबर महाले सर विभागीय अध्यक्ष – व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र अनुभवी अध्यापक
आपणास वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!!आपण आपल्या कुशल संवादकौशल्याने, निवेदन शैलीने समाजमनावर एक वेगळा प्रभाव निर्माण केलेला आहे. आपले औदार्य सर्वश्रुत आहे. आपल्या अचूक नियोजन कौशल्याने मंगळ ग्रह मंदिराला निराळे वैभव लाभून सामाजिक कार्य करणारे अधिष्ठान त्याला प्राप्त करून दिले आहे. आपण पत्रकारिता क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगीरी केल्याने विभागीयअध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया म्हणून उच्च स्तरावर आपली निवड झाली आहे .आता आपल्या व संचालक मंडळाच्या उत्कृष्ठ कार्यामूळे दैनिक भास्कर गृप तर्फे थायलंड येथे सिनेअभिनेता शर्मन जोशी यांच्या हस्ते मंगळग्रह संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे…
आपली माणसाला ओळखण्याची लकब अप्रतिम आहे.पराकोटीचे सामंजस्य आपल्या हसतमुख चेहऱ्यावर झळकते. प्रत्येक माणसाशी जोडलेले भावनिक नाते स्नेहाचे गीत गाते. स्वच्छ, निर्मळ प्रतिमा प्रत्येकाला भुरळ घालते. जातीपातीच्या पलीकडे घेऊन जाणारा आपला दृष्टीकोण मानवात चैतन्य निर्माण करते.मुख्याध्यापक असतांना कामावर निष्ठा अढळ राहिली. अमळनेर ह्या मातृभूमीबददल प्रेम, जिव्हाळा जपला आहे.अशा आपल्या उदात्त जीवनास उदंड सलाम! आपल्याला भावी जीवनासाठी निरामय स्वास्थ्य, आनंददायी प्रवाह आपणास मिळो ही सदिच्छा!

वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द….
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
🎂💐🎂🎂
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *