मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच….
![]()
मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोप
शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील

मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच….
मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोप
शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचे झाले आहेत. मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते बिनबुडाचा आरोप करीत आहेत असे शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगरूळ ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनल ची तन ,मन आणि धनाने जबाबदारी श्रीकांत पाटील यांनी स्वीकारली होती. प्रत्येक प्रभागाच्या उमेदवाराला सहकार्य केले. जिल्ह्यात फक्त मंगरूळ येथे शिवसेना उबाठा चा लोकनियुक्त सरपंच झाला. त्यांनतर उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या उमेदवार श्रुती श्रीकांत पाटील यांना उपसरपंच करण्यासाठी विरोधी गटाने पाठिंबा दिला आणि मंगरूळ ग्रामपंचयतींचे दोन्ही सरपंच आणि उपसरपंच ही पदे शिवसेनेला मिळाली. मात्र भाजप च्या पराभूत झालेल्या पदाधिकाऱ्याला हे यश सहन झाले नाही म्हणून त्याने अपयशी ठरलेल्या असंतुष्ट लोकांचे सहकार्य करून खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. शिवसेना उबाठा चे पदाधिकारी फुटलेले नाहीत त्यांना इतरांनी येऊन पाठिंबा दिला आहे. असा खुलासा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कल्याण पाटील , शहर प्रमुख सूरज परदेशी , प्रताप शिंपी , नितीन निळे यांनी केला आहे.

