अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा…
![]()
अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा…
प्रांताधिकारी,तहसीलदार सह विविध मान्यवरांनी दिली उपस्थिती…



अमळनेर :(प्रतिनिधी) ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते.
या दिवसाचे औचित्य साधुन सन्मान फाउंडेशन तर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना दिव्यांगांच्या समस्या निवारण सल्ला मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग तर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीसाठी कार्यक्रम राबवण्यात आली होता. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती, प्रांताअधिकारी महादेव खेडकर साहेब, अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा साहेब,अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थिती दिली होती,
सदर कार्यक्रमात शासनातर्फे विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच मतदान जनजागृती विशेष कार्यक्रम प्रशासनातर्फे राबवण्यात आला होता, सदर कार्यक्रमात
Gitnts ग्रुप तर्फे सम्मान फाउंडेशना मोलाची मदत म्हणून देणगी स्वरुपात मदत करण्यात करण्यात आली होती.
त्यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे सन्मान फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आले होते त्यात कोविड काळात अकराशे लोकांचे अंत्यविधी करणारे ज्ञानेश्वर धनगर यांच्या विशेष सत्कार करण्यात आला होता,
तसेच सन्मान फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले, कार्यक्रमात दिव्यांग बांधवांतर्फे आर्केस्ट्रा गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.तसेच मुंबई येथील विनोद बेडसे यांचे फाउंडेशनच्या निर्मितीसाठी मोलाचे मार्गदर्शन ठरले.
सदर सन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन वानखेडे, सुनिता वानखेडे, महेंद्र पाटील, गोविंद पाटील, प्रवीण बैसाणे, बिपिन पाटील, धनराज मालचे, बाळासाहेब सोनवणे, आत्माराम अहिरे, राहुल बाविस्कर,साहेबराव संदानशिव,महावीर मोरे,जितू कुवर, सावखेडा गावाचे सरपंच कदम मॅडम इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले होते. भद्रा प्रतीक उद्योग समूहातर्फे दिव्यांग बांधवांसाठी अल्प आहाराची व्यवस्था करून देण्यात आली होती.
सदर कार्यक्रमात सूत्रसंचालन सुप्रसिद्ध असलेले आदरणीय वसुंधरा लांडगे मॅडम आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

