तडफदार हक्काचे महिला नेतृत्व
सुषमाताई देसले पाटील…….
![]()
तडफदार हक्काचे महिला नेतृत्व
सुषमाताई देसले पाटील…….


ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ताईसाहेब सुषमा वासुदेव देसले पाटील……
मितभाषी व्यक्तीमत्व, विविध पुरस्काराने सन्मानित,भावी जिल्हा परिषद चे प्रामाणिक कणखर नेतृत्व ताईसाहेब
सौ सुषमाताई देसले पाटील
आदर्श लोकनियुक्त सरपंच, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती , विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई
अशी विविध पदावर कार्यरत आहेत.
राजकीय,सामाजिक काम करत असतांना त्यांचे पती कर्तबगार पोलीस अधिकारी बापूसाहेब वासुदेव देसले यांनाही सामाजिक कार्याची तेवढीच आवड आहे.
ताईसाहेब यांना नेहमीच त्यांचे मार्गदर्शन असते…ताईसाहेब यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून मतदारांच्या मनात प्रेम निर्माण केले आहे..त्या दहिवद गावात लोकनियुक्त सरपंच असतांना गावाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील्या..
गावात रस्ते, वृक्षारोपण, महीला सक्षमीकरण, असे विविध उपक्रम राबविले…आजतागायत अमळनेर तालुक्यातील अनेक सामाजिक,राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावत कोरोना सारख्या परिस्थितीत त्यांनी यथाशक्ती प्रमाणे उपेक्षित गरजूंना मदतीचा दिला आहे. शहरातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा विशेष सहभाग असतो. मदतीसाठी आर्थिक हातभार त्यांचा मोठा असतो.. त्यांचा मैत्रीच्या गोतावळा मोठा आहे..
यांचा सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते
नागरिक यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. ताईसाहेब मितभाषी व शांत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
ना.मंत्री दादासाहेब अनिल पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई पाटील यांचे नेहमीच सहकार्य असते.. अनेक विकास कामांसाठी व निधीसाठी ते नेहमीच मदत करतात…
ताईसाहेब आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक पदावर बहुमताने निवडून आल्या त्यांच्या काम करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे पुढे त्या जिल्हा परिषद सदस्यासाठी दहिवद गटातून उमेदवाराच्या दावेदार आहेत.. आणि मतदारांचाही त्यांना पाठिंबा आहे व आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर त्यांना शंभर टक्के निवडून आणतील अशी लोकांमध्ये चर्चा आहे..
ताईसाहेब यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्यांना विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत..
ताईसाहेब १ डिसेंबर आपला वाढदिवस…
त्या निमित्ताने आपल्यासाठी दोन शब्द…
ताईसाहेब…
“तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !”
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

