1 min read

भरवस विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसौ विजय सोनवणे व आबासौ आर आर सोनवणे यांची आज सेवापूर्ती निमित्ताने शुभेच्छा!!

Loading

जाहिरात…

भरवस विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसौ विजय सोनवणे व आबासौ आर आर सोनवणे यांची आज सेवापूर्ती..

अमळनेर प्रतिनिधी
नोकरी करत असताना एका वेळेनंतर सेवानिवृत्त व्हायचे हे खूप जणांचे एक ध्येय असते. खर तर हा इतक्या वर्षांचा खडतर प्रवास आज संपणार असतो. एकीकडे जो सेवानिवृत्त होणार असतो म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी असते पण दुसरीकडे आजचा दिवस म्हणजे इतक्या वर्षाच्या मेहनतीची सांगता करण्याचा दिवस असतो.

आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे

ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.

तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?

तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..

भरवस विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसौ विजय सोनवणे तथा ते संस्थेचे सचिव पण आहेत… त्यांनी आपल्या काळात अनेक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. सरांनी गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही .. शाळेत शिस्तीला प्राधान्य दिले.विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून शाळेचे नाव जिल्हा पातळीवर नेले….
त्यांच्या शाळेतील उपक्रमशील व क्रीडा शिक्षक आर आर सोनवणे हेही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले .. सरांना संस्थेचे अध्यक्ष व सचिव दादासाहेब प्रा.डॉ संजय सोनवणे व बापूसाहेब विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची चांगली संधी मिळाली. . सरांनी त्या संधीचे सोने केले..सरांना चांगल्या कामाची पावती म्हणून अनेक विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले सरही विविध सामाजिक,शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत..
त्यांच्या सेवापुर्ती निमित्ताने दोन शब्द…

आजचा दिवस आपल्यासाठी
अनमोल दिवस ठरावा आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य
अधिक सुंदर व्हावं..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
उपशिक्षक
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *