1 min read

धरणगाव शहरात तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !…

Loading

धरणगाव शहरात तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !…

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगांव – भारतातील थोर समाज सुधारक – ज्ञानसूर्य – शिक्षणतज्ञ – राष्ट्रपिता – सत्यशोधक – महात्मा ज्योतिराव फुले यांची धरणगाव शहरात स्मृतिदिनी अभिवादन रॅली काढण्यात आली.
अभिवादन रॅली ची सुरुवात लहान माळीवाडा माळी समाज व पाटील समाज मढी येथून करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याच्या बैलगाडीवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित माळी, पाटील व बहुजन समाजाच्या मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.
लहान माळीवाडा परिसरातून रॅलीची सुरुवात झाली. गबानंद चौक, कोट बाजार मार्गे धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला उपस्थित शैक्षणिक – सामाजिक – राजकीय – पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली पुढे मोठा माळीवाडा या मार्गाने जात सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळी वाडा माळी समाज मढी येथे अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, कोषाध्यक्ष व्ही टी माळी, दिपक महाजन, सचिव गोपाल माळी, राजेंद्र महाजन तसेच पाटील समाजाचे अध्यक्ष भीमराज पाटील व संपूर्ण पंचमंडळ व राजकीय क्षेत्रातील शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वरजी महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते भानुदास विसावे, भागवत चौधरी, शिवसेनेचे विलास महाजन, दशरथ महाजन, सुखदेव महाजन, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, पत्रकार धर्मराज मोरे, रवि महाजन, माळी समाजाचे विश्वस्त विजय महाजन, भाजपाचे संजय महाजन, कैलास माळी, आर.डी. महाजन, माळी समाजाचे सल्लागार पंच एच डी माळी, पी.डी.पाटील, नितेश महाजन तसेच सर्व बहुजन समाजातील जेष्ठ मान्यवर पत्रकार शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, पत्रकारीता क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर तथा युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *