1 min read

रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वाव
सविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन

Loading

रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वाव
सविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन

अमळनेरला माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- रांगोळी स्पर्धेतून महिला बंधू-भगिनींच्या कलागुणांना वाव मिळून सुप्त गुण विकसित होतात. अत्यंत स्तुत्य उपक्रम माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मित्रपरिवारांनी राबविला व त्या स्पर्धेमध्ये अमळनेर शहरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देतो असे मा.नगरसेविका सविता संदानशिव यांनी
आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या
शिरिषदादा मित्र परीवार यांच्या वतीने आयोजित इंदुमाई निवास, येथे सुंदर माझी रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या रांगोळी स्पर्धेत ४०० पेक्ष्या अधिक महिला व युवतींनीं सहभाग नोंदवल्याने चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रगती रवींद्र मुसळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, प्रतिमा प्रशांत काटकर यांनी द्वितीय क्रमांक व प्रेरणा किरण पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला,
प्रथम पारितोषिक सोन्याचे नाणे , द्वितीय पारितोषिक चांदीचे नाणे, तृतीय पारितोषिक स्मार्ट वॉच व सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ “पर्स” चे बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिंदन करण्यात आले.
व्यासपीठावर मा. आमदार शिरीष चौधरी मा. नगरसेवक बबलीभाऊ पाठक,सामाजिक कार्यकर्ते धनंजय महाजन, मुडी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन योगराज संदानशिव,युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी, मा. नगरसेविका सविता संदानशिव, स्वाती पाठक, पुष्पा भामरे होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सविता संदानशिव होत्या.. यावेळी अनेक स्पर्धतील सहभागी व बक्षीसपात्र व उत्तेजनार्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *