1 min read

सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार.

Loading

सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार.

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे सर्व शाखीय सुवर्णकार समाज पदाधिकारी बैठक संपन्न झाली.सदर बैठकीचे आयोजन श्री.आनंद दुसाने यांच्याकडे करण्यात आले होते.बैठकीच्या सुरवातीला श्री.संजीव विसपुते यांनी पाहुणे व उपस्थितांचा परिचय करून स्वागत केले.संत नरहरि सोनार व नाना शंकरशेठ सोनार यांच्या प्रतिमांचे पूजन करून सकल भारतीय सुवर्णकार संघटना, नाशिक चे श्री.मिलिंद सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाज संघट काळाची गरज आहे म्हणून येता १ ते ७ डिसेंबर हा ” सर्व शाखीय सुवर्णकार समाज संघटन सप्ताह ” म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले. समाजापुढे असलेल्या अनेक संधी व समस्यांवर चर्चा उपस्थितांमध्ये झाली. आभार श्री.दिपक पवार,सर यांनी मानले.सदर बैठकीस सर्व श्री मधुकर सोनार, अविनाश पांडव, सुरेश भामरे,राजू दाभाडे, संदीप सराफ, जितेंद्र भामरे, योगिता डहाळे,शितल सोनार, दिप्ती अहिरराव हे सर्व शाखीय सुवर्णकार समाज पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *