1 min read

संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सह‌भागी होण्याचा संकल्प

Loading

संविधान जागर रॅलीत- विराट संख्येने सह‌भागी होण्याचा संकल्प

म्हसावद : भारतीय राज्यघटनेचा स्वीकृतीचा दिवस अर्थात २६ नोहेंबर संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या रॅलीत म्हसावद पंचक्रोशीतील संविधानप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

गेल्या वीस वर्षापासून जळगाव शहरात संविधान जागर रॅलीचे आयोजन संविधान दिनी करण्यात येत असते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे सदर रॅलीचे आयोजन करीत असतात. दरवर्षी संविधान प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाला वाचविण्यासाठी, संविधानाचे जागर, आणि गौरव करण्यासाठी एकत्रित येतात.

येत्या रविवारी २६ नोहेंबरला सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या रॅलीच्या पूर्वतयारीसाठी आज म्हसावद ता.जि. जळगाव या गावात सायंकाळी सभेचे आयोजन करण्यातआले होते. या सभेत शेकडो माता -भगिनी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली.

या सभेला संबोधित करताना – मुकुंदभाऊ सपकाळे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले. संविधानाचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. संविधान विरोधी शक्ती ते बद‌लविणाची भाषा करीत आहेत. तेव्हा आपण सा-यांनी सजग, जागृत राहणे आपले कर्तव्य आहे असे असे,सांगितले. या प्रसंगी प्रा. डॉ. सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील,
सतिष सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. मोतिराय, आभार सतिश सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला म्हसावद गावाचे सरपंच गोविंदा पवार, सुधाकर मेढे, नारायण चहाण, सुमीत सोनवणे, निलेश शिरसाळे यांच्या सह नागरिक बंधु भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *