1 min read

विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Loading

विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांना नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला.
सविस्तर माहिती अशी कि विजयसिंग पवार यांना १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर
शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार बी वाय चौधरी हायस्कूल शिरसाळे येथील उपशिक्षक विजयसिंग पवार यांना नुकताच जाहीर झाला. शैक्षणिक व सामाजिक तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पवार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.२७ नोव्हेंबर रोजी जालना येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
त्यांचे अभिनंदन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ,
व संचालक मंडळ व जळगाव ग.स. पतपेढीचे माजी उपाध्यक्ष श्यामकांत भदाने व मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले,पत्रकार ईश्वर महाजन, उमेश काटे ,निरंजन पेंढारे,संजय सुर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *