धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ?
![]()
धरण होईल न होईल पण त्या धरणातले पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर कसे येईल याचे उत्तर कोणी देईल का ?
संदीप घोरपडे यांचा रोखठोक सवाल.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मागील तीस वर्षापासून पाडळसे धरणाचा गाजराचा हलवा अनेक आमदारांनी शेतकऱ्यांना दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतले मात्र धरणात आणलेले पाणी सिंचनासाठी शेताच्या बांधापर्यंत कसे आणले जाईल याचा लेखाजोखा जेव्हा कोणीच देत नाही तेव्हा हा प्रश्न जनतेच्या मतदारांच्या व शेतकऱ्यांच्या वतीने विचारावासा वाटतो की धरणाच्या कामासाठी आम्ही मतदार तालुक्याच्या इतर विकास कामांकडे दुर्लक्ष करून धरण पूर्ततेकडे आस लावून बसलो आहोत मात्र धरण पूर्ण झाल्यानंतर किंवा ते पूर्ण होण्यापूर्वीच धरणातील मोठा साठा इतरांनी पळवलेला आहे व शेतकऱ्याच्या आकांक्षांना मात्र मधाचे बोट लावून टोलवा टोलवी सुरू आहे आज मी जनतेच्या वतीने आवाज उठवताना या प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छितो की ते पाणी बेरोजगार तरुणांना शेतीकडे वळविण्यासाठी शेतापर्यंत कसे आणता येईल यावर विचार व्हायला हवा व त्या दृष्टीने प्रयत्न करणे लोकप्रतिनिधींचे मुख्य कार्य असेल त्यात कोणी सांगतील की पाणी लिफ्ट करून शेतापर्यंत पोहोचवले जाईल मात्र यापूर्वीचा लिफ्ट इरिगेशनचा अनुभव अत्यंत कटू आहे त्यातून अनेक शेतकरी पोळून निघालेत म्हणून शेतकऱ्यांनी विश्वास टाकावा अशा पद्धतीने सिंचनाचा प्रश्न सुटावा यादृष्टीने मी विचार करतो व त्याच पद्धतीने जनमानस तयार करण्याचा ऑटोकाठ प्रयत्न करीत आहे कोणी म्हणतील हे की जलसाठा जमा झाल्यानंतर आपोआप विहिरी भूजल पातळी भूजल पातळी वाढ होणार आहे परंतु तेथेही ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल तापी नदीच्या दक्षिणेला अग्निजन्य खडक असल्याकारणाने या बाजूला भूजल पातळीत वाढ होणे हे कदापि शक्य नाही किंवा झाली तरी नदीकाठच्या काही गावांना याचा लाभ होईल परंतु धरणाच्या नावाखाली पूर्ण अंमळनेर मतदार संघ अनेकांनी मतदानासाठी वेठीस धरलाय म्हणून या प्रश्नाला आता जनतेने वेगळ्या दृष्टीने समजावून घेणे गरजेचे आहे उदाहरणार्थ अमळनेर तालुक्यातील इंच नइंच शेत जमीन सिंचनाखाली येईल या पुढील काळाची गरज असेल अन्यथा अमळनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची उपलब्धता नसल्याने आणि शेती हाताशी असताना पाण्याविना ती कवडीमोल भावाने विकून शेतकऱ्यांचे पोरं महानगरांकडे मोलमजुरीसाठी निघून जाताना दिसून येत आहेत हे थोपवायचे असेल आणि अमळनेर तालुका ,पारोळा तालुका सुजलाम सुफलाम करायचा असेल तर सिंचनाचा प्रश्न गांभीर्याने हातात घेऊन त्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे व त्याच कामाला आम्ही प्राधान्य देणार आहोत
अनेक प्रश्नांचे उत्तर
सुटेल जनतेचे एक कोडे. आपल्यातलाच एक संदीप घोरपडे यांना पडलेले आहे…

