उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम
![]()
उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम


उरुळी कांचन: पुणे सोलापूर रोड सोनई न्यू व्हेज हॉटेल येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डी डब्ल्यू ए युके या संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ.चंद्रकांत हरपळे अध्यक्ष हडपसर मेडिकल असोसिएशन, डॉ. दिलीप माने मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल हडपसर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन युके, डॉ.प्रशांत गोडसे, डॉक्टर मधुकर पदवाड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुस्राव्य संगीत मैफिल कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. या प्रतिनिधीवर मत व्यक्त करताना डॉ.रवींद्र भोळे म्हणाले की अनेक ठिकाणी दिवाळीच्या दिवसात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन संगीत व गायनाचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय भारतीय संगीत उत्सवांचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. त्यामुळे दिवाळीत नवीन चैतन्यमय वातावरण निर्माण होत असते.

