1 min read

एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित

Loading


एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांची व गरीब निराधार कुटुंबीयांची रोटरी व आधार संस्थेने केली दिवाळी आनंदित

दिवाळी म्हणजे दीपोत्सव आनंदाचे पर्व आणि तो इतरांना वाटल्याने द्विगुणीत होतो म्हणूनच सणाच्या निमित्ताने सुंदर उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत आपण सर्वच आनंदाने नवनवीन वस्तूंची खरेदी करतो, नवीन कपडे घेतो, फराळाचे पदार्थ खाऊन सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो परंतु असेही काही आजही लोक आहेत. त्यांना दैनंदिन गरजाही पूर्ण करता येत नाही, त्यांना आनंद वाटण्यासाठी एक सुंदर पाऊल आधार व रोटरीच्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून नित्य नियमाने दर महिन्याला न्यूट्रिशन व दर वर्षाला दिवाळीच्या वेळी नमकिन फराळ किट वाटले जात आहे. एच आय व्ही सह जगत असलेल्या अनाथ किंवा एकल पालक असलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली

या कार्यक्रमात मुलांना कपडे, फराळ, बिस्कीट, चॉकलेट्स न्यूट्रिशन किट (किराणा सामान)व प्रोटीन किटव इतर गरजेच्या वस्तू वाटप करण्यात आल्या.
आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब चे ए जी अभिजित दादा भंडारकर यांनी केले. व रोटरी प्रेसिडेंट प्रतीक जैन यांनी रोटरी क्लब चे कामाबदल महिती सांगितली व मार्गदर्शन केले. आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटिल मॅडमानी कार्यक्रमा विषयी माहिती देऊन दात्याचे आभार मानले. महाराष्ट्रातील नामांकित स्वादिष्ट नमकीनचे मालक श्री निलेश पाटील यांच्याकडून दिवाळीच्या फराळ व नमकिन मिळाले. जळगाव येथील T. W j मिलिंद पाटील यांनी न्यूट्रिशन किट दिले मकसूभाई बोहरी व मेहराज बोहरी यांनी त्याच्या हाताने कपडे शिऊन मुलांना वाटप केले , सन हिल्स सोलर टेक्नॉलॉजी चे हितेश पाटील व मनोज पाटील यांच्याकडून देखील भरघोस मदत मिळाली अशा अनेक दात्यानी भरघोस मदत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व या कार्यक्रमासाठी अधिक दात्यांची गरज असल्याचे आवाहन आधार संस्थेने संचालक रेणू प्रसाद मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर लोकमत पत्रकार संजय पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खबरीलाल चे संपादक जितेंद्र ठाकूर उपस्थित होते, अध्यक्षीय भाषणात अमळनेर पत्रकार आपल्या सोबत असून अजून अनेक दात्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रतीक जैन, राजेश जैन , विजय पाटील, ईश्वर सेनानी,पूनम कोचर,रोहित सिंघवी,महेश पाटील , ताहा बुकवाला, आशिष चौधरी, किर्तीकुमार कोठारी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याचं बरोबर आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद या प्रकल्पाचे समन्वयक संजय कापडे , तोशिप सर, दिपक विश्वेश्वर,पुनम पाटील , तेजस पाटकरी, मुरलीधर बिरारी, निशिगंधा पाटिल, सुषमा विसपुते मॅम, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते मध्ये रोटरी क्लब व आधार संस्थेच्या अमळनेर या कर्मचाऱ्यांचे विशेषतः सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *