1 min read

ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम

Loading

ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली येथे झाली रंगीत तालीम
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा गाव व गोडाऊन येथे, अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी येथील केमिकल कंपनीमध्ये तसेच कल्याणमधील मोठागाव ठाकुर्ली येथील एमआयडीसी डोंबिवली येथील कंपनीमध्ये आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, औद्योगिक सुरक्षा, मत्स्य व्यवसाय विभाग, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांसह आपदा मित्र, ठाणे महापालिकेचे आपत्ती निवारण दल, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनी या रंगीत तालीमीत सहभाग घेऊन आपत्ती निवारणास आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन संबंधित विभागांना या रंगीत तालीमीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार आज सकाळी ८.३० वाजेपासून जिल्हा कमांड अँड कंट्रोल रुमसह तीनही तालुक्यातील कंट्रोल रुममध्ये आपत्ती निवारणासाठी सज्जता ठेवण्यात आली होती. तसेच चक्री वादळाची सूचना मिळताच व संबंधित ठिकाणी आपत्ती आल्याची सूचना मिळताच आपत्ती निवारण दल, आपदा मित्र तसेच ठाणे आपत्ती निवारण दलाचे जवानांसह आरोग्य, महसूल व इतर यंत्रणांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले. या कालावधीत केमिकल कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना धोक्याची सूचना देणे व आवश्यक असल्यास त्यांचे स्थलांतर करणे, घटनास्थळावरील आपदग्रस्तांना जखमींना प्रथमोपचार करून रुग्णालयात नेणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे व रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी आजच्या रंगीत तालीमीत सादर केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून समन्वय साधत होते. तर भिवंडी येथील पडघा ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व गावांमधील पूरग्रस्त या आपत्तीस्थळावर अमित सानप, उपविभागीय अधिकारी भिवंडी,अधिक पाटील, तहसीलदार भिवंडी, अभय गायकवाड, अप्पर तहसीलदार भिवंडी, प्रदीप घोरपडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडी, राजेश पवार, अग्निशमन दल अधिकारी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी
विशाल इंदुलकर, निवासी नायब तहसीदार भिवंडी
डॉ.माधव वाघमारे, वैद्यकीय अधिकारी भिवंडी
अतुल भिसे, कनिष्ठ अभियंता, सा. बां. विभाग, भिवंडी, संतोष अष्टेकर टोरेंट पॉवर अधिकारी भिवंडी, पडघा मंडळ अधिकारी संतोष आगविले, राहुर मंडळ अधिकारी रवींद्र काळे, तलाठी गणेश पाटील, रोहन पवार, संजीव धात्रक, श्री.लोकरे , पडघा पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक अमोल साळुंखे ,पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनुपमा पाटील ,पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी , सन्माननीय सदस्य, व सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबरनाथ येथील आपत्ती स्थळी तहसीलदार प्रशांती माने व कल्याण येथील आपत्तीस्थळी तहसीलदार जयराज देशमुख हे स्वतः उपस्थित राहून बचाव कार्याच्या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *