निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष!
![]()
निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष!
साने गुरुजी विद्यालयातील चळवळींमधील आंदोलकांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना ट्रान्सजेंडर चळवळीचे प्रमुख आंदोलक व कार्यकर्ते शमिभा पाटील यांचे प्रतिपादन



अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष! असा युक्तिवाद साने गुरुजी विद्यालयातील चळवळींमधिल आंदोलकांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना ट्रान्सजेंडर चळवळीचे प्रमुख आंदोलक व कार्यकर्ते शमिभा पाटील यांनी केला.
माणूस म्हणून जगताना व्यवस्थेकडून आपले हक्क मिवण्यासाठी जे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात ते आयुष्यात कोणतीही लढाई लढू शकतात. पौगंडावस्थेतील मुला मुलींना एकमेकांबद्दल प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे लिंगभेद समजून घेतले पाहिजे. असेही शमिभा यांनी पुढे सांगितले. त्यांच्या बोलण्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन अनेक अनामिक गोष्टी माहिती होत गेल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्री पुरुष समानता निश्चितपणाने दृढ होईल. सानेगुरुजी विद्यालयात विविध चळवळी व सामाजिक आंदोलनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्दशाने समाजाभिमुख आंदोलन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी होते. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांची होती. ती प्रास्ताविकातून मांडतांना संदीप घोरपडे म्हणाले की प्रत्येक आंदोलनाची शासन दखल घेतेच असं नाही. त्यामुळे आंदोलन कर्ते निराश होतात त्यांची निराशा दूर करण्यासाठी बलवर्धक सत्काराचे आयोजन केले. सूत्रसंचालन डी ए धनगर तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. यावेळी सकल मराठा समाजाचे जयवंत पाटील, सचिन वाघ, हर्षल जाधव, गुड्डू देशमुख, सकल धनगर समाजाचे मच्छिंद्र लांडगे, डी ए धनगर, क्षेत्रीय माळी समाजाचे मनोहर महाजन गंगाराम महाजन आदिवासी कोळी समाजाचे मधुकर कोळी हिलाल सैंदाणे आदिवासी समाजाचे मधुकर चव्हाण गुलाब बोरसे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजनेचे कुणाल पवार , पाकीजा पिंजारी शरद पाटील, पाडळसरे धरणं जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,महेश पाटील,रणजित शिंदे, रामराव पवार, सुशील भोईटे, मुस्लिम समाजाचे राजू शेख रियाज शेख महिला मंडळ सदस्य सीमा रगडे दर्शना पवार तृतीयपंथी संघटनेचे शामिभा पाटील यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विविध सामाजिक चळवळीच्या प्रमुख आंदोलकांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदिप घोरपडे यांनी संविधान प्रत ,शाल देवून केला. कार्यक्रमासाठी विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

