1 min read

डॉ शरद पाटील वादविवाद
स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्रात तृतीय

Loading

डॉ शरद पाटील वादविवाद
स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्रात तृतीय

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर पोलीस स्टेशन चे गोपनीय अधिकारी डॉ शरद पाटील
दि.०७-११-२०२३ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे मानव अधिकार जन जागृती वादविवाद स्पर्धा २०२३ आयोजीत करण्यात आली होती. त्यात जळगांव जिल्हा प्रतिनिधी स्पर्धक म्हणून असतांना तिसरा क्रमांक पटकावला आहे.
त्यांचा नुकताच नाशिकला सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानित
करण्यात आले.
आता नाशिक परिक्षेत्रातून ते पुढे राज्य पातळीवर त्यांना संधी मिळाली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातून ते एकमेव आहेत.त्यांनी नावलौकीकतेचे श्रेय जळगांव जिल्हयाचे मा.पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, रमेश चोपडे,
सुनील नंदवाळकर , विजय शिंदे यांना व परीवाराला दिले..
त्यांचे अभिनंदन सर्व सहकारी बंधू-भगिनींनी,व मित्र परीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *