1 min read

शहरातील नागरी समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर

Loading

शहरातील नागरि समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघांनी घेतले न पा प्रशासनास धरले धारेवर

धरणगाव प्रतिनिधीं

शहरातील विविध समस्या संदर्भात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी, उपशहरप्रमुख जितेंद्र धनगर, याचासह शिष्टमंडळाने खालील प्रमाणे म्हणणे मांडले आहे. तसेच नगरपालिका प्रशासनस शहरातील विविध समस्या मांडल्या त्यामध्ये पाईपलाईन साठी खोदलेला रस्ता पूर्ववत करने, धरणगांव शहरातील साने पटागंणावरील घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ते ताबडतोब स्वच्छ करणे

मोठा माळी वाडा परीसरातील रामलीला चौक, मशीद अली टॉयलेट ची मोटार ३/४ महिन्यांपासून बंद आहे, ती मोटार दुरुस्ती करून आजच्या आज टाकण्याचे आश्वासन ओ एस श्री पारधी , व इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बिऱ्हाडे यांनी दिले तसेच संमधीत अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याने शिवसेना सहसपर्क श्री वाघ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री खैरे यांना ही त्वरित कारवाई करा नागरिकांना सुविधा लवकर द्या अन्यथा शिवसेना स्टाईल ने टॉयलेट ला कुलूप लावू असा इशारा दिलाधरणगांव शहरातील हायमास्ट लॅम्प दुरुस्ती करून पून्हा सुरू करने, शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करने.

धरणगांव शहरातील घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ते त्वरीत साफसफाई करून नागरीकांना आरोग्य प्रदान करावे,
नेहरू नगरमधील महिलांसाठी न पा मागील टॉयलेट सुरू करणे
आशा विविध विषयांवर चर्चा करून तोडगा न निघाल्यास जण अदोलन उभे करू होणाऱ्या परिणाम स न पा प्रशासन जबाबदार राहील असे सांगितले

यावेळी उपस्थित शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवा निलेश चौधरी उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी,नगरसेवक जितेंद्र धनगर किरण मराठे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *