1 min read

तुमच्या शाळेत जाण्याने बहुजनासाठी शिक्षणाची वाट मोकळी झाली!!

Loading

तुमच्या शाळेत जाण्याने बहुजनासाठी शिक्षणाची वाट मोकळी झाली!!

बा भिमा तु गेलास शाळेत हे आम्हा बहुजनासाठी विदयेची दारे मोकळी झाली..खडतर वाट न्याहाळत असतांना तु कशाची तमा केली नाही..बा भिमा तु तेव्हाच ठरवून टाकले की, मला एकटयासाठी मुक्तीची वाट नको तू लहानपणापासून बुध्द जगला..तुझी करुणा त्या वेळेला पाझरली..बा भिमा तू समतेचा अखंड सागर निर्माण केला. अफाट ज्ञानाची लालसा तू पूर्ण केलीस ज्या वेळी तुझ्याकडे जीवन जगण्या इतपत पैसे नव्हते..तुझ्या शाळेत जाण्याने बहुजनाच्या आयुष्यात प्रकाश आला..ही आमची दिवाळी व दसरा होता..बा भिमा तुझ्या पेटविलेल्या दिव्यांची रोषणाई विद्यार्जन करणाऱ्यात दिसून येते. तु दिलेल्या संविधानाने आम्ही आज बोलु शकतो..तुझी उतराई आम्ही कधीही करु शकणार नाही..बा भिमा तुझा शाळा प्रवेश स्वातंत्र्याची उज्ज्वल पहाट बनुन आली..

एस. एच. भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *