1 min read

इनलाईट फाउंडेशनच्या वतीने ज्ञानदेव हांडे यांना डाॅ. कलाम पुरस्कार प्रदान

Loading

इनलाईट फाउंडेशनच्या वतीने ज्ञानदेव हांडे यांना डाॅ. कलाम पुरस्कार प्रदान

मुंबई | प्रतिनिधी : धारावी येथील माॅर्निंग स्टार स्कूल हाॅलमध्ये इनलाईट फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांना इनलाईट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश आण्णा यांच्या हस्ते ” भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम ” पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांतर्गत हांडे यांना सन्मानचिन्ह पदक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. फाउंडेशनचे सल्लागार राजेश सोळंकी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *