1 min read

ग्रामपंचायत खडके सरपंचपदी मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड

Loading

ग्रामपंचायत खडके सरपंचपदी मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड

मित्रपरिवाराने केला त्यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भाजपला दणदणीत यश प्राप्त झाले.भाजपाचे, तालुका उपाध्यक्ष-
मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची ग्राम पंचायत खडके सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

सविस्तर माहिती अशी कि मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची निवड पहिले सरपंच भिवराज शिवंन भिल हे वारले एसटी राखीव म्हणून जागा होती ती जागा रिक्त झाल्यानंतर मी उपसरपंच असतांना माझ्याकडे तर प्रभारी सरपंच पद म्हणून आलेले आहे . माजी सरपंच पदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या माननीय आमदार स्मिताताई वाघ, भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, जिल्हा परिषद मा. सदस्य व्हि.आर पाटील,मा.पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, शितल देशमुख, चंद्रकांत कंखरे,भाजप युवा मोर्चाचे शिवाजी राजपूत व विविध पदाधिकाऱ्यांनी माझे अभिनंदन केले.
मच्छिंद्र पाटील यांचा सत्कार करतांना गावाचे पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य व यांनी सत्कार केला. गावाचे ग्रामस्थ गणेश पाटील, राजू पाटील आसाराम पाटील व सुशिलाबाई रमण रणदिवे ग्रामपंचायत सदस्य सर्व मिळून सत्कार करण्यात आला.
खडके गावातील पहिली महिला नवनीयुक्त पोलीस पाटील सौ तृप्ती मनोज पाटील व विशाल पंडित राजपूत अग्निविर फौजी निवड झाला असून त्यांच्या मातोश्री सौ मिनाबाई पंडित राजपूत व आपल्या गावातील प्र. सरपंच पदाचा पदभार श्री मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांचा सत्कार आपल्या ग्राम पंचायत खडके मार्फत करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *