1 min read

अमळनेर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण

Loading

अमळनेर सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण

अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत वृक्षरोपण करण्यात आले. सतर्कता जागरूकता सप्ताह अंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरण व प्रदूषण याबाबत समस्या बाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्य गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत भुसारी व सहाय्यक व्यवस्थापक विनोद जुमडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिक्षक सुनील पाटील, सुनील साळुंखे, सुरेश पाटील, नितीन पाटील, किरण पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. आर आर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अमळनेर- शालेय परिसरात वृक्षारोपण करताना श्रीकांत भुसारी, विनोद जुमडे, गायत्री भदाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *