1 min read

सबगव्हाण येथील  शेतकऱ्याची कपाशी नेली चोरून

Loading

सबगव्हाण येथील  शेतकऱ्याची कपाशी नेली चोरून

 सबगव्हाण ता. अमळनेर दि३० ऑक्टोबर

येथील भूषण छगन पाटील यांची भरवस रस्त्यालगत शेती आहे.सध्या शेतात कपाशीचा हंगाम असल्याने ते दररोज शेतात कपाशी वेचण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह जातात.  सकाळपासून त्यांनी वेचलेला कापूस त्यांनी संध्याकाळी शेताच्या बाहेर आणून ठेवला व  गवत कापण्यासाठी परत शेताच्या बांधावर गेले.त्यावेळी रसत्यालगत ठेवलेला कपाशीचा गोण अज्ञात मोटरसायकलस्वार येऊन तो चोरून घेऊन गेले. असे शेतकरी भूषण पाटील यांनी फोनवरून कळविलेले आहे. सदर कापूस गोंन चोर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेले आहेत.पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा असे गावकरी बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *