सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद
![]()
सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव आर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद
रसिक झाले मंत्रमुग्ध..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. ‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षक सतीश कांगणे सर यांनी संगीत क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे..
29 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सतीश कागणे प्रस्तुत गुरुदेव ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन चिंतामणी शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ताई सौ विद्याताई युवराज पाटील व नानासाहेब युवराज पाटील
सचिव,नंदुरबार जिल्हा संस्थाचालक संघटना सचिव,नासिक विभाग संस्था चालक संघटना, नाशिक विभाग
सचिव श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी,पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सरोजताई भांडारकर भद्रा प्रतीक मॉलचे संचालक आबासाहेब प्रताप साळी, रायडर सायकलच्या सौ हीना दुसाने, हटके वडापावचे श्री विजय पाटील कीर्ती कुमार कोठारे, कृष्णा बॅटरीचे महेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मुख्य गायक सतीश कागणे ,सुनिता डोंगरे, मनीषा कागणे ,सविता देशमुख सूत्रसंचालक ग्यानेश वर्मा यांनी
एक से बढकर गाण्याची मेजवानी टीमने आपल्या आवाजातून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .भरभरून प्रतिसाद अमळनेरच्या व परिसरातील प्रेक्षकांनी दिला तसेच वेळोवेळी गाण्यांना दाद देऊन उत्साह वाढवला अशा कार्यक्रमाने विचारांची साखळी तुटते व आनंद मिळतो
कार्यक्रमाची प्रास्ताविक पत्रकार उमेश काटे यांनी केले. स्टेज नियोजन स्पर्धा परीक्षा संचालक व्ही ए पवार सर व साहित्य परिषदेचे शरद पाटील, पत्रकार उमेश काटे , स्पर्धा परीक्षा संचालक विजय पवार ,चिमणपुरी पिंपळे आश्रम शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व भगिनी मंडळाचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व भाऊसाहेब देशमुख,सोपान भवरेसर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
यावेळी अमळनेर तालुक्यातील रसीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.




