साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व
अ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा…
![]()

साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर व
अ.भा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगावला पत्रकार संघातर्फे पत्रकार विमा योजनेचा शुभारंभ समारंभ होत आहे. या निमित्ताने अ. भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बीड येथील मित्रवर्य मा. वंसतराव मुंडे यांचे अध्यक्षतेखाली विशेष समारंभ होत आहे.या निमित्ताने साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर
त्यांनी आठवणीने फोन करुन भेटीस बोलावले. मी बीड येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक असतांना मा. वसंतराव मुंडे यांचेशी आंतरिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले होते. आज या भेटीच्या प्रसंगी माझा नवा कविता संग्रह सृजन संवाद मुंबई येथून गीतेश शिंदे यांनी प्रकाशित केलेला अंतर्बाह्य त्यांना सप्रेम भेट दिला. या भेटीत बीडच्या कार्यकालातील अनेक घडमोडींच्या आठवणीत रममाण झालो होतो.बीडकर हे मैत्रीचे नाते जिव्हाळ्याने जपतात. याचा पुनश्चः सुखद अनुभवही आला.

