1 min read

आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना महत्त्वाची- काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

Loading

आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना महत्त्वाची- काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर कसे चालवायचे ही चिंता लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असतानाही मोदी सरकार मात्र पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करत नाही. राज्यातील सरकारने वीज महाग केली आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी महागाईवरून भाजप सरकारवर सडकून टिका केली.असे काग्रेस पक्षाचे प्राताध्यक्ष नाना पटोले यांनी अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की
जीएसटी च्या माध्यमातून सर्व सामान्याची लुट सुरू आहे.भाजपने देशातील लोकांना गरीब केले,मुठभर लोकांना श्रीमंत केले आहे.शेतकऱ्यांच्या विरोधात तिन काळे कायदे आणले,शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढली,भाजपप्रणीत सरकार हे शेतकरी विरोधी आहे, पाडळसरे धरण १८ टिएमसील पाणी जमा झाले असते तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले असते,केंद्राची मान्यता मिळाली नाही,दुष्काळाची घोषणा नाही, राज्याच्या पैसा केद्रात जातो,सर्व मित्राच्या कंपनीला जात आहे, सत्ताधारी पक्षातील नेते मूग गिळून गप्प आहेत.
राज्याच्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, दिपावली अंधारात जाणार आहे, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली,२०२४ मध्ये सरकार आल्यानंतर
पाडळसरे धरण,बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या ,जुनी पेंशनचा प्रश्न काग्रेस पक्ष मार्गी लावणार आहे हाच आमच्या पक्षाचा वचननामा असे सांगितले.ते पुढे म्हणाले कि दररोज संविधानाची हत्या
देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. त्याग करावा लागला. आपल्याला मोठ्या संघर्षानंतर स्वांतत्र्य मिळाले. पण ज्यांचा या लढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. ते दररोज संविधानाची हत्या करत आहेत. त्यामुळे संविधान व स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपल्याला स्वातंत्र्याची आणखी एक लढाई लढावी लागणार आहे.
मणिपूर जळत आहे. त्यावर मोदींनी संसदेत एक शब्दही काढला नाही. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली. पण त्यावरही ते बोलले नाही. उलट काँग्रेसवर टीका करत हास्य विनोद करणारा असंवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला. देशाने हा धोका ओळखावा. भारताला महासत्ता बनवण्याचे काँग्रेसचे स्वप्न असून, ते पूर्ण करण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले.
भाजपने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा,राजपूत आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली, पण ते आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपने सुरु केले असून त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या सर्व समाजामध्ये भाजपविरोधात प्रचंड मोठा आक्रोश आहे. पण सरकारला जनभावना समजत नाहीत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. जरांगे -पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागत आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार हे खोटे बोलून सत्तेत आलेले सरकार आहे. आज महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद सत्ताधारी जाणीवपूर्वक निर्माण करू पहात आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.
पुन्हा सत्तेत येऊन दीड वर्ष झाली, फडणविसांना त्याचाही विसर पडला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत या सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. लोकप्रतिनिधींविना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासक चालवत आहेत .त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. आरक्षण मिळावे ही अनेक समाजाची मागणी आहे, त्यांच्या मागणीला न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.
राज्यातील अनेक उदयोग गुजरातमध्ये पळविले, बुलेट ट्रेन साठी गुजरात ने ३५ टक्के व महाराष्ट्र राज्याने ६५ टक्के वाटा दिला पण त्याचा फायदा गुजरातला आहे. भाजप महाराष्ट्राची लूट करीत आहे. ते सुरतेला वाटतात,दुसऱ्यांची घरे फोडण्यात त्यांना आसूरीआनंद आहे, भाजपबद्दल जनमानसात खूप चिड आहे. सध्या राज्यात ते निवडणूका घेत नाही.
राज्यात आरोग्य व्यवस्था घसरली डेंग्यू सारखा वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झाले.राज्याला दिवाळखोरी कडे भाजप घेऊन चालला आहे.अमळनेर येथील मंत्री अनिल पाटील यांच्यावर टिका करत सत्तेसाठी लाचार झालेली माणसं काय करतील सांगता येत नाही. जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते तेच आता शांत आहेत. अनिल पाटील हे नौटंकी करतात हे अमळनेर करांनी ओळखले आहे.
महागाई मुळे २१९ नागरिकांनी आत्महत्या केली.मोदी सरकारने लाखो रुपायाचे कोटी कर्ज देशावर करुन टाकले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सडक योजना आली..आता लाखो रूपायांची योजना आणली.समृद्दी मार्गावर करोडो रूपये खर्च केले.तेच पैसे सिंचन क्षेत्रावर खर्च झाले असते राज्य सुजलाम सुफलाम झाला असता असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर काँग्रेसचे खासदार उल्हास पाटील, आदिवासी समाजाचे नेते प्रतिभाताई शिंदे, माजी आमदार डॉ बी एस पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अनिल शिंदे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोकुळ पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटील, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुलोचना व रीता बाविस्कर,देवानंद पवार, विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील,
राष्ट्रवादीच्या प्रदेश महीलाप्रमुख तिलोत्तमा पाटील,संदीप घोरपडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,संगिता पाटील होते.

अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व बळीराजाचे पूजन करण्यात आले. अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला त्यांना नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. अमळनेर काँग्रेस पक्ष, ठाकरे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी व शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून नाना पटोले यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
आदिवासी नेत्या प्रतिभाताई शिंदे,डॉ अनिल शिंदे,मा.आमदार डॉ बी.एस.पाटील यांनी भाजप सरकारचा खरा चेहरा लोकासमोर मांडला.सध्याच्या
शासनाला जनता कंटाळली,शरच्चंद्र पवार साहेब यांच्यावर मोदी टिका करतात, अजीत पवार खाली मान टाकून ऐकतात एवढी लाचारी, ईडी सिबीआयच्या धाकाने हे सर्व भाजपात गेले.एवढे चोर जमा झाले आहेत जनतेचे लक्ष आहे निवडणुकीत उत्तर देतीलच असे सांगत अमळनेर शहरात रस्ते, नाही, आमसभा नाही, गुन्हेगारी वाढली आहे. भाजप पक्षामध्ये डझनभर मंत्री भ्रष्टाचारी आहेत भाजप त्यांच्याजवळ मांडीला मांडी लावून बसत आहे आता कुठे गेली नैतिकता असेही त्यांनी आपल्या भाषणातून भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर मांडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शांताराम पाटील,भागवत गुरूजी,अमित पाटील महेश पाटील,,संभाजी पाटील,प्रेमराज चव्हाण,के.डी.पाटील,संगिता पाटील,
रज्जाग शेख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील,प्रा.सुभाष पाटील, प्रा श्याम पाटील, धनगर दला पाटील,डि.डि.पाटील,
महीला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,लोटन पाटील, मुन्ना शर्मा, अर्बन बँकेचे संचालक मनिष जैन, किसान सभेचे बी.के.सुर्यवंशी
मगनभाऊ पाटील, सत्तारदादा,हाजी शेखा मिस्त्री, पन्नालाल पावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचीनभाऊ पाटील, शब्बीरभाऊ, सेवानिवृत्त न्यायधिश गुलाबराव पाटील ,प्रा अशोक पवार, अनिल पाटील,हरी वाणी,डॉ किरण पाटील, अली मुजावर, झुबेर पठाण, इबरान जनाब,मा. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व मा.नगरसेवक श्याम पाटील, दिनेश पवार,एस.सी.तेले,शिवसेना ठाकरे गटाचे विजू मास्तर,राजूभाऊ संदानशिव,नितीन निळे,सह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी, किसान सेलचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.

मा.आमदार डॉक्टर बी एस पाटील,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे ,डॉक्टर अनिल शिंदे आपले मनोगत व्यक्त करतांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *