1 min read

आनंदाचा शिधा या सरकारी योजनेत सरकारला लुटणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी संपादक डॉ.किशोर पाटील यांची
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी!

Loading

आनंदाचा शिधा या सरकारी योजनेत सरकारला लुटणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी संपादक डॉ.किशोर पाटील यांची
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी!

ठाणे:कल्याण दि.२८(मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी गणेश उत्सवा पासुन आनंदाचा शिधा फक्त १००/ रुपयात शिधावाटप दुकानात (रेशनिंग कार्यालय) सुरू केला ही आनंदाची बाब आहे, मात्र ज्यांना ठेका दिला त्या ठेकेदारांनी शासनाची व नागरिकांची फसवणूक केली आहे, साखर,चणाडाळ, रवा, मैदा, डालडा,व आदी साहित्य शिधावाटप दुकानात
उपलब्ध केला आहे, परंतु ज्यांना ठेका दिला आहे त्यांनी यामध्ये मोठी तफावत केली आहे, एक किलोची साखर फक्त ९७० ग्रॅम , चणाडाळ फक्त ४७० ग्रॅम , मैदा ५००ग्रॅम, रवा ४८०ग्रॅम, अशाप्रकारे पॅकिंग करून भरले आहेत तसेच ज्या पिशवीमध्ये सदर शिधा भरला आहे ती पिशवी प्रिंटिंग चे पैसे दोनशे रुपये असून किती मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने शासनाच्या व जनतेच्या पैशांची लुटमार सदर ठेकेदार करत असल्याचे समोर आले आहे, ही बाब एका शिधावाटप दुकानात प्रत्यक्ष वजन करून आम्हाला दाखवल्यामुळे ती जनतेसमोर आणण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, कारण शिधा वाटप दुकानदारांनाच सामान्य ग्राहक हा आमची फसवणूक करता अशा प्रकारच्या शिव्या व त्यांच्याशी सुसंवाद वाद- विवादा प्रमाणे साधला जातो, त्यामुळेच ही बाब पुढे येण्यासाठी सदर दुकानदाराने प्रत्येक वस्तूचे वजन करून आम्हाला दाखवले व त्या वजनाचे फोटो काढून ही बाब शासनापुढे सत्यता पडताळण्यासाठी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून पुढे नेत आहे, याबाबत संबंधित ठेकेदारांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्री व संबंधित अधिकारी वर्ग यांच्याकडे करत आहे, कारण गणपती, दसरा गेला आता दिवाळी तोंडावर आली आहे,त्यामुळे या गोष्टीवर कुठेतरी आला बसला पाहिजे, व सामान्य जनतेची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे म्हणून मी ही सत्यता शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ,याबाबत संबंधित मंत्री छगन भुजबळ यांनी जातीने लक्ष घालून ज्या ठेकेदारांना हे ठेके दिले आहेत,
त्यांच्यावर कारवाई करून सर्व वस्तू ग्राहकांना व समस्त जनतेला
वजनामध्ये कोणतीही घट न करता , एक किलो, अर्धा किलो या वजनानेच मिळावी अशी मी आशा व्यक्त करत आहे, त्याचप्रमाणे ज्या शिधा वाटप दुकानदाराने ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्या दुकानदाराचेही मी आभार मानत आहे,
कारण आनंदाचा शिधा या एका पॅकेजमध्ये एक किलोचा फरक असल्यामुळे हजारो लाखो रुपयांची अपरा-थाफर सदर ठेकेदार करत असल्याचे समोर आले आहे, म्हणून शासनाची दिशाभूल केलेल्या ठेकेदारांवर कारवाई होणे व जनतेला न्याय मिळणे ही महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री मा.ना.श्री.छगन भुजबळ यांच्याकडे मी डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव म्हणून मागणी करत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *