1 min read

नवनियुक्त शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार

Loading

नवनियुक्त शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगांव जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती किरण कुवर यांची नियुक्ती झाली. त्यांच्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी कि नवनियुक्त मा शिक्षणअधिकारी (माध्य ) श्रीमती किरण कुवर मॅडम यांचा सत्कार जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनाचे अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड चे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब जयवंतराव पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे परदेशी साहेब तसेच तडवी साहेब मारवड हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री प्रा.संजय बागुल , तसेच लिपिक श्री महेश पाटील यांनी शाल,बुके देऊन केला..
जळगांव जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव पाटील यांनी शिक्षक ,कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा केली.सत्काराला उत्तर देतांना नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर मँडम म्हणाल्या कि मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *