भविष्यात निश्चितच बाल वैज्ञानिक निर्माण होतील-उमेश काटे टीडीएफ चे कार्याध्यक्ष यांचे प्रतिपादन
![]()
भविष्यात निश्चितच बाल वैज्ञानिक निर्माण होतील-उमेश काटे टीडीएफ चे कार्याध्यक्ष यांचे प्रतिपादन
शिरूडला व्ही.झेड.पाटील, हायस्कूमध्ये”डॉ कलाम फिरत्या प्रयोगशाळा” व्हॅनचे स्वागत


अमळनेर प्रतिनिधी
फिरत्या प्रयोगशाळेमुळे तालुक्यात एक नव संजीवनी निर्माण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन संशोधक वृत्तीला वाव मिळत आहे. याचेच फलित म्हणून भविष्यात निश्चितच बाल वैज्ञानिक निर्माण होतील असे मत टीडीएफ चे कार्याध्यक्ष उमेश काटे यांनी व्यक्त केले.
शिरूड (ता अमळनेर) येथील व्ही झेड हायस्कुल मध्ये “डॉ कलाम फिरत्या प्रयोगशाळा” या सायन्स मोबाईल व्हॅनच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. माजी सरपंच काळू नाना पाटील हे अध्यक्षस्थानी होते. मिलके चलो असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सरपंच गोविंदा सोनवणे, अतुल सोनवणे, बापूराव महाजन, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी ए धनगर, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, योजना पाटील, हिरामण पाटील, विजय बोरसे, कल्याणी पाटील, विनायक पाटील, गोपाल गावंडे, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. अनिरुद्ध पाटील यांनी आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या “डॉ.कलाम विज्ञान फिरती प्रयोगशाळा” या सायन्स मोबाईल व्हॅनबाबत सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान “मारवड परिसर विकास मंच”च्या माध्यमातून ‘मिलके चलो असोसिएशन’ची टीमने विज्ञानाच्या विविध प्रयोग साहित्यमधून विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजून सांगितल्या. श्रीमती देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. यावेळी संध्या शिंदे, व्ही डी सुर्यवंशी, श्री.निकम, श्री. जाधव, सविता बोरसे, राधिका अहिरे ,श्रीमती मोरे , वाडीले मॅडम——–
आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूड (ता.अमळनेर)- डॉ. कलाम फिरत्या प्रयोगशाळे च्या मोबाईल व्हॅन समवेत विद्यालयाचे विद्यार्थी व मान्यवर

