कापसाचा लिलाव तसेच मकाला योग्य तो भाव द्यावा…
![]()
कापसाचा लिलाव तसेच मकाला योग्य तो भाव द्यावा…
सचिव कृ.उ.बा.समिती, अमळनेर
ता. अमळनेर जि. जळगांव यांच्याकडे निवेदनाद्वारे संचालक सचीन पाटील यांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी
वरील विषयास अनुसरुन आपल्या अमळनेर तालुक्यात व जळगांव जिल्हयात मुख्य पिक
कापुस, मका, कडधान्य असून बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात आवक होत असते. कापुस हा ज्या वेळेस बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतो त्यावेळेस कापसाला योग्य भाव मिळत
नसल्याने शेतकरी नाराज होवून जात असतो. तसेच मका व कडधान्याच्या बाबतीतही असेच शेतकरीला भाव मिळत नसल्याने आमच्याकडे तक्रार करीत असतात. यावर संपूर्ण संचालक मंडळाची
चर्चा करुन तात्काळ कापसाचा जाहिर लिलाव तसेच मका व कडधान्याला हमी भावा पेक्षा कमी किमतीत खरेदी होवू नये यावर दक्षता घेण्यात यावी व लिलावामध्ये आलेल्या शेतकऱ्यांसाठी
पिण्याच्या पाण्याची तात्काळ नियोजन करण्यात यावे. होणारे वाद-विवाद जागेवर दखल घेवून सोडविण्यात यावे. लिलाव करतांना व्यापारी व आडददार हे मुद्दामुन खाली टाकून धान्याची नासाडी
करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन घाम गाळुन पिकवलेले धान्याचे या पध्दतीने नासाडी करुन त्यांचे आर्थीक नुकसान होत असते.
वरील सर्व विषय गांभिर्याने घेवून तात्काळ अंमलबजवाणी करण्यात यावी. तसे न झाल्यास आम्हांला नाईलाजास्तव उपोषणास किंवा मोर्चा काढावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचीन पाटील,सुभाष सुकलाल पाटील यांनी एका पत्रकाद्वारे निवेदन देऊन मागणी केली आहे..

