1 min read

मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.-अभिनय दरवडे
बालरोग तज्ञ, कवी, गायक, अभिनेता व समुपदेशक यांचे प्रतिपादन

Loading

मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.-अभिनय दरवडे
बालरोग तज्ञ, कवी, गायक, अभिनेता व समुपदेशक यांचे प्रतिपादन

मराठी वाड्:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमाला संपन्न..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
माणसे गेली दूर आता मुके संवाद झाले,
मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले कुणाला ताण आहे, कुणाला तणाव आहे सभोवताली जमलेला हा निर्जीव जमाव आहे.स्वतंत्र झाली माणसे पण मेंदू बधिर झाले मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले” तर
जीवन हे अतिशय विचित्र पद्धतीचे झालेलं आहे जगणं हे हल्ली अनुकरणातून सुरू झालेले आहे.. तो काय म्हणेल? लोक काय म्हणतील? त्याच्यानुसार जगायचं असतं माझ्या जगण्याला अर्थपूर्णता कधी येते.. ज्या वेळेला चार लोक माझ्याकडे बघतील तर काय म्हणतील या अनुकरणातून या तुलनेतून आम्ही खरं म्हणजे जगत असतो. आजकाल सिरीयल मध्ये बघून मुला मुलींची नावे सुद्धा ठेवतो.. त्याच्या जन्मापासूनच त्याच्या जगण्याचा जो आलेख आहे तो टेलिव्हिजन संचालक बघून आपण टेलिव्हिजन संचाला बघून आम्ही या सगळ्या गोष्टी सुरु करतो.त्या पद्धतीने जीवन जगतो यापेक्षा मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.असे
अमळनेरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते डॉअभिनय दरवडे (बालरोग तज्ञ, कवी, गायक, अभिनेता व समुपदेशक) सांगा जगायचं तरी कसं! या विषयावर बोलतांना सांगितले…
व्यासपीठावर हर्षल गुलाबराव बोरसे
युवा उद्योजक व संचालक ग्रीन ग्लोब बायोटेक पुणे,तर अध्यक्षस्थानी मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश
जोशी होते..
पाहुण्याचा परिचय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे यांनी केला.कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शिक्षक छगन पाटील यांना सावित्रीबाई फुले शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.. मराठी वाड्:मय मंडळाच्या व्याख्यान मालेला आर्थिक सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दात्यांचा सत्कार करण्यात आला.
वक्ते अभिनय दरवडे पुढे म्हणाले की
गल्लीतल्या, वाडीतल्या किंवा गावातल्या मुलांचा खेळताना होणारा कल्ला ,निसर्गातलं त्यांचा फिरणं, बागडण, मातीशी असलेली त्यांची नाळ, आज बाहेरचे बॅक्टेरिया आजार यांच्या नावाखाली केवळ आठवणींमध्ये दिसून येतो. कारण, आजचा पिढीमधल्या या मुलांचे मॉम आणि पॉप्स मुलांच्या भविष्याच्या विचाराने जरा जास्तच पझेसिव्ह दिसतात, त्याच्यामुळे मुलं मात्र सकाळी सात ते संध्याकाळी सात ट्युशन मध्ये अडकलेले दिसून येतात. त्यामुळे मुलांचं बालपण जगणं राहून जातं. परिणामी मुलं घरात राहून मोबाईल, व्हिडिओ गेम, टीव्ही , लॅपटॉप यांच्या आहारी जातात. या सगळ्यात मुलांची दृष्टी आणि मेंदू तर कमकुवत होतोय. सोबत मुलांचा मानसिक संतुलन देखील बिघडल्याच्या बातम्या आमच्या समोर येतात. मग आम्हाला डॉक्टरला अमाप पैसे घालावे लागतात . यावरून एक लक्षात आलं की निसर्गामुळे मिळणाऱ्या मोफत आरोग्य , आज आम्हाला विकत घेण्याची वेळ आलेली आहे . आणि एवढं करून बालपणाचा तो आनंद नाहीच. म्हणून जगणं महाग होत चाललं आहे, किंबहुना ते आपण ते महाग बनवत चाललो आहोत.
कार्यक्रमाला जायचे तर अतिशय उंची कपडे घालतो साध राहणीमान मागासलेपणाचे आज लक्षण मानलं जातं.. जीवनात दोनच दिवस महत्त्वाचे असतात एक जन्म झाला आणि दुसरा का जन्माला आलो.?
ट्युशन्स ला जाणारे नीट साठी प्रीपेड करणारे जेईसाठी प्रीपेड करणारे नेमकं कशासाठी झटतायेत? सगळ्या क्षेत्रांमधला ध्येयवाद संपला.. संवेदना हरवलेल्या समाजामध्ये नेमक्या संवेदना कशा पेरायच्या? याच्यावर आता परिषदा घेणं खरं गरजेचं आहे.. शिक्षणाच्या मूळ रचनेमध्ये आम्ही मूलगामी परिणाम रचनात्मक परिणाम रचनात्मक बदल करणं गरजेचं होतं. शिक्षण व्यवस्था सुद्धा पोरकी झाली.. यांत्रिक बंदी मग आमच्या शिक्षण व्यवस्थेने काय केलं बरं की 35% पासून पुढच्या सगळ्यांना एका झटकयात सगळी पात्र मंडळी ही गुणवत्ता किंवा त्यांची गुणवत्ता कशावर मार्कांवर आधारित का गुणवत्ता मग हे सगळे मार्कशीट तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत किती मार्कशीट गोळा करतो आपण हे सगळे मार्कशीट डोंबिसाइड सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट डोमिसाईल बरोबर अजून कुठले कुठले सर्टिफिकेट असतात तरी आपण समाधानी नाहीत..
समाधान व आनंद पेरता आला पाहिजे…
जिवंत माणसाशी आपला आता संवाद संपला आहे..
दुसऱ्या च्या जगण्यावर आपण अनुकरण करतोय…जगणं शिकणाऱ्या मुलांना राम शिकवावा लागेल असे सांगितले. शेवटपर्यंत श्रोत्यांनी आनंदापुर्ण व्याख्यानांचा आनंद घेतला.. त्यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
व्याख्यानमालेला उपस्थित असलेले
प्रमुख अतिथी युवा उदयोजक हर्षल बोरसे
सेंद्रिय शेती याबाबत सविस्तर माहिती दिली.आपल्या शरीरात किती विष झाले याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत यावर आपले मत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वांग्मय मंडळाचे सदस्य प्रा डॉ सुरेश माहेश्वरी सर यांनी केले.
व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी
मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डाँ अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाने, रमेश पवार, कार्यवाहक सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डाँ पी.बी भराटे,
संदीप घोरपडे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,
सौ वसुंधरा लांडगे, प्रा श्याम पवार ,श्रीमती स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, भैय्यासाहेब मगर, प्रा शीला पाटील, बजरंग अग्रवाल, अजय केले यांनी प्रयत्न केले..

चौकट
यावेळी वक्ते अभिनय दराडे यांचा
मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व सदस्य व
वाघ कुटुंबातील नातेवाईक व मित्र परिवार यांनी जंगी सत्कार केला त्या सत्काराने वक्ते दराडे भारावले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *