1 min read

रब्बी हंगामात घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडा ;-शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघाची मागणी

Loading

. रब्बी हंगामात घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाला पाणी सोडा ;-शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघाची मागणी


तहसीलदार सह पाटबंधारे आधिकर्यांना दिले निवेदन

: धरणगावपरिसरातील यावर्षी पावसाअभावी खरीप आणि रब्बीची नापेर स्थिती झाल्याने, दोन्ही हंगाम वाया गेले असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. या परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पाटाला ३ पाणी सह पहीले पाणी नोव्हेंबर महिन्यात सोडण्याची मागणी शेतक-यांसह सह शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ ,युवासेना जिल्हा प्रमुख व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ,यांचा नेतृत्वाखाली नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामा घेण्यासाठी पाटाला पाणी सोडण्याचे निवेदन सहाय्यक पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय जाधव व तहसीलदार सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. यात राज्यशासन या जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तसेच काही सर्कलमधे लागोपाठ २१ दिवस पाऊस न पडल्याने पंचनामा होवून शेतकऱ्यांना पीक विम्या चा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे कसा बसा रब्बी हंगाम हाताला लागेल या आशेवर येथील शेतकरीवर्ग होता. मात्र रब्बी हंगामातील इतर सर्वच नक्षत्रे कोरडी गेली असून, अद्याप दमदार पाऊस झालेला नसून परतीचा पाऊस देखील पडला नाही
दरवर्षी या वेळी येथील रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची कामे उरकून शेतक-यांची गहू पेरणीची लगबग सुरु असते. मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्याने ज्वारीसह इतर पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे या परिसरात कुठेच दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरी व कूपनलिका आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर गंभीर होत चालला आहे. मागील काही महिन्यांपासून परजिल्यातून चारा आणून शेतकरीवर्ग जनावरे जगवित होता. मात्र काही शेतकरीवर्ग दररोजच्या चा-यामुळे वैतागला असल्याने जनावरे विकण्याच्या मार्गावर आहे. मात्र गि-हाईक नसल्याने त्यांना किमतही येत नाही.परिसरतील धरणगाव तालुक्यातील हे कापूस आगार समजले जाते. या परिसरातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांपसाची पेरणी तसेच गहू लागवड करीत असतात. यावर्षी पाऊस होईल या आशेवर काहींनी कोरडवाहू कापूस, ज्वारी ,मका लागवड केलेली होती. तसेच काहींनी कांद्याची लागवड केली आहे. आॅक्टोबरमधील हिट आणि वातावरणातील बदल यामुळे येथील कापसावर लाल्यारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस पिक धोक्यात जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच काही कापसावर फुलकिडी पडली असल्याची माहिती शेतक-यांनी दिली. या परिसरात कापूस ज्वारी मका लागवडीसाठी साधारण २० ते २२ हजार खर्च झालेला आहे. त्यामुळे पाऊस झाला तरच शेतक-यांच्या हातात काही मिळेल अन्यथा झालेला खर्च, कष्ट वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. या परिसरातील प्रत्येक गावातून पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याची सोय तसेच जनावरांची छावणी करण्याची मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.धरणगाव तालुक्यातील जिरायती पट्ट्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ जाणवत आहे. जनावरांना चाराटंचाई असून, येत्या नोव्हेंबरतच पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे.अशा विविध समस्या चे निवेदन देण्यात आले यावर त्वरित तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल ने अदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला,
यावेळी उपस्थित जळगाव लोकसभा शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेना जिल्हाप्रमुख मा नगराध्यक्ष निलेश चौधरी , तालुकाप्रमुख जयदीप पाटील, मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, मा पंचायत समिती सभापती दीपक भाऊ सोनवणे, जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे, उप तालुकाप्रमुख नंदू पाटील, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, मा नगरसेवक जितेंद्र धनगर, मा नगरसेवक किरण भाऊसाहेब ,मा नगरसेवक उमेश महाजन ,उप तालुका संघटक लीलाधर पाटील, फिरोज अब्बामिया पटेल ,छोटू भाऊ चौधरी, गोपाल चौधरी, बाळू महाजन ,रणजीत शिकरवार, सचिन चव्हाण, संतोष सोनवणे, संजय धामोळे, रमेश पारधी, ज्ञानेश्वर महाजन, संतोष महाजन, राहुल चव्हाण, किरण अग्निहोत्री, नरेंद्र शिरसाट ,किशोर महाजन, सुदर्शन भाऊ भागवत, साळवे येथील संजय नारखेडे, पिंपरी येथील योगराज धनगर, रमेश पांडे ,पिंटू महाजन, अमोल चौधरी, गजानन महाजन ,गोपाल पाटील, तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *