नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.”
![]()
“नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.”
‘पूर्वीच्या काळी आपण कुणाला मॅरेज अनिव्हर्सरी, वाढदिवस इ. प्रसंगांना कधी शुभेच्छा द्यायचो नाहीत,पण प्रत्यक्ष लोकांना भेटायचो. हल्लीच्या युगात मात्र व्हाट्सऍप,फेसबुक यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची स्पर्धा वाढली आहे.प्रत्यक्षात मात्र भेटी होत नाहीत. नात्यात नाटकीकरण आले आहे,नैसर्गिकरण राहिल नाही. घरातील संवाद हरपलेत. आई-वडील व मुले यांच्यातील विसंवाद वाढत आहेत.आणि याला जबाबदार कुठेतरी सोशल मिडिया आहे. ही मानसिकता ओळखून भोंदूगिरी,अंधश्रद्धा वाढली आहे. तरुणपिढीमध्ये वाचन संस्कृती कमी झाली आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचून जो फील येतो तो पीडीएफ फाईल मधील कादंबरी वाचून येत नाही. आजच्या तरुणाची तासभर व्याख्यान ऐकायला मानसिकता राहिली नाही. म्हणून हिंसाचार वाढतो आहे.संस्कार राहिले नाहीत.
वर्तमानपत्र वाचल्यामुळे बुद्धीची कवाडे उघडतात. परंतु वृत्तपत्र वाचली जात नाहीत. पाश्चिमात्य देशांचे आपण अनुकरण करतो.पण त्या देशांनी सोशल मीडिया बऱ्यापैकी सोडला आहे. व्यावसायिक अनुषंगाने ते फक्त या मीडियाचा वापर करतात.आपल्या सारखे पाच-पाच, सात-सात तास ते मीडिया मध्ये गुंतून राहत नाही. आपल्या कडील तरुणाई यात आकंठ बुडाली आहे. त्याच उच्चाटन होणं काळाची गरज आहे.
वरील गोष्टी ऐकून मनात अनेक प्रश्न उभे राहतात,खरोखर आपणही त्यात आहोत का?आपलाही जास्त वेळ यावर खर्ची होतो का?आपल्या पाल्यावर ही यु ट्युब संस्कृती झाली आहे का?मग यावर उपाय काय करता येईल?
आपण मुलांना वेळ दिला पाहिजे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे.एखाद्या विषयावर सर्वांचे मत घेतले पाहिजे. मित्र,नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटायला गेलं पाहिजे. अस करता येईल.
सोशल मीडियावर अनेक चांगले लोकही आहेत,जे पत्रकार नाहीत पण ते एखाद्या चांगल्या विषयावर लिहितात,बोलतात. परंतु दुर्दैवाने आशा लेखांना वाचक कमी असतात.लाईक,कंमेट कमी मिळतात.याउलट एखादा सेल्फी वैगरे सारख्या गोष्टींना लाईकचा व कमेंट चा पाऊस पडतो.त्यामुळे या गोष्टी घालवण्यासाठी ठरवून काम करावे लागणार आहे.म्हणजे वेगवेगळे गट करून चर्चा घडवून आणाव्या लागतील. त्याचे फायदे-तोटे सांगावे लागतील.तरच हे शक्य आहे.
पत्रकारिता हा व्यवसाय आहे, वर्तमानपत्राचं समाजमन घडवण्याचं काम असतं. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जगातही वर्तमानपत्र टिकून आहेत,त्यांचं एक वेगळं महत्त्व आजही आहे.इलेक्ट्रॉनिक मीडिया ने एककल्ली पणा वाढतो,तर वर्तमानपत्रांमुळे मन सर्वश्रुत होते.पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांचा पत्रव्यवहार पूर्ण पानभर छापून यायचा.पण हल्ली सोशल मिडिया च्या माध्यमातून एखाद्या विषयावर पटकन विचार मांडता येतात.त्यामुळे हल्ली वाचकही पत्रव्यवहार करीत नाही.ठरलेलीच लोक पत्र लिहितात. वर्तमानपत्रांमुळे विचारांना चालना मिळते व विचारी समाज निर्माण होतो.
येणाऱ्या काळात काही वर्षांनी आपल्यालाही समजेल की सोशल मीडियावर तासंतास घालवणे फायद्याचे नाही म्हणून त्याचा वापर ही कमी होईल.
इंटरनेट वरील पॉर्न विडिओ वेगाने व्हायरल होतांना दिसताय, स्वतःचा मोबाईल नसला तरी श्रीमंत मित्राच्या मोबाईलवर ते पहिले जातात.म्हणून पालकांनी दक्ष राहीले पाहिजे. ज्या गोष्टी समजायला इयत्ता ११ वी १२ वी उजडायची ती आता मुलांना सातवी आठवीतच समजते.त्याच्या कोणाचेच बंधन नाही की कुठली सेन्सॉरशिप नाही.यामुळे मुलांच भावविश्व मधील उलगडणं असतं, त्यांना समजावं,सांगणं शिल्लकच राहील नाही.त्यांच्या मनावर वाईट विचारांचा पगडा पडतो आहे.घरातील मोठ्यांचा सल्ला ऐकून घेण्याची मानसिकता मुलांमध्ये राहिली नाही.त्यांना जणू सर्वच माहिती असतं.रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या क्लासेस मुळे मुलामुलींमध्ये वाईट प्रकार घडताय. पालकांना समजत असून ते काही करू शकत नाहीत.
चीन सारख्या देशांनी व्हाट्सएप,फेसबुकवर बंदी आणून त्यांनी स्वतःचे फेसबुक ट्विटर लाँच करून लगाम लावला आहे.चीनच्या तरुणांना भारत देश आवडतो,ते म्हणतात, भारतात आपल्याला स्वतःचे विचार मांडता येतात.आमच्या देशात विचार स्वतंत्र नाही.
मानसोपचार तज्ज्ञांना येणाऱ्या काळात काय मानसिकता राहील याची चिंता भासतेय.यांच्यातून बाहेर पडण्यासाठी घराघरांमध्ये संवाद घडले पाहिजेत. मित्र,नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजेत.तरच येणारी पिढी चांगली घडेल,अन्यथा मानसिक रुग्णांची संख्या वाढेल.
—श्री शरद भिका पाटील
उपशिक्षक, आर्मी स्कूल,अमळनेर
तालुका सचिव – खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य,अमळनेर


