डॉक्टर मयूर पाटील यांच्यातर्फे पिताश्री स्वर्गीय डॉ.किसन पाटील लिखित पुस्तके भावार्थ वाचनालयासाठी ग्रंथदान
![]()

डॉक्टर मयूर पाटील यांच्यातर्फे पिताश्री स्वर्गीय डॉ.किसन पाटील लिखित पुस्तके भावार्थ वाचनालयासाठी ग्रंथदान
[ ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या प्रयत्नाने भावार्थ मोफत वाचनालयाला प्राप्त झाली
ग्रंथदानान्वये ४४८० रुपयांची ग्रंथसंपदा ]
सुप्रसिद्ध सेवानिवृत्त साहित्यिक स्वर्गीय प्रा.डॉ.किसन महादू पाटील ( माजी प्राचार्य,एस.एन.डी.टी.महिला विद्यालय ,जळगाव ) लिखित ४४८० रुपयांची एकूण ४० पुस्तकांची साहित्य संपदा टी.डब्ल्यू.जे.सोशल रिफॉर्म,चिपळूण या संस्थेच्या भावार्थ मोफत वाचनालयासाठी डॉ.किसन पाटील यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर मयूर पाटील तथा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शोभा फाउंडेशन,जळगाव यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी ग्रंथप्रेमी विजय लुल्हे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे संस्थापक जिल्हाप्रमुख यांच्याकडे सुपूर्द केली.विजय लुल्हे ही ग्रंथसंपदा ‘ पुस्तक दान – ‘ भावार्थ ‘ वाचनालय चिपळूण संस्थेला पाठविणार आहेत.विजय लुल्हे यांच्या विनंतीला मान देऊन विश्वासपूर्वक प्रेमादराने डॉ.मयुर पाटील यांनी १० पुस्तकांच्या प्रत्येकी ४ प्रती ग्रंथदानात लुल्हे यांना पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केल्या.ग्रंथदानासाठी डॉ.मयूर पाटील यांना अथर्व प्रकाशनाच्या संचालिका सौ.संगिता माळी,मातोश्री श्रीमती शोभा पाटील अर्थात श्रीकृष्ण शोभा फाउंडेशनच्या सचिव तसेच सदस्या भागिनी ममता पाटील,प्रणिता चौधरी तसेच सदस्य नरेंद्र महाजन व विजय महाजन यांनी प्रोत्साहन दिले.उपरोक्त श्रीकृष्ण शोभा फाऊंडेशन वाचन – लेखन संस्कृती जोपासणे, ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन,आरोग् शिबिरांचे आयोजन कार्यक्रमान्वये जगजागृती करणे कामे उद्दिष्टांन्वये करीत आहे.
साहित्यिक डॉ.किसन पाटील यांच्या अजोड वाङमयीन लेखनाचा कार्यालेख
प्राप्त सन्मान :- *अध्यक्ष,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित अ.भा.मराठी जनसाहित्य संमेलन,मोझरी,(अमरावती ) *अध्यक्ष ५७ वे अ.भा.अंकुर मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर,(जळगाव) * अध्यक्ष राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन पाचोरा ( जळगाव ) * अध्यक्ष,खान्देशस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन जळगाव
संशोधक मार्गदर्शक:-
मराठी साहित्य भाषा आणि लोकसाहित्यात एकूण १८ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी.आणि ९ विद्यार्थ्यांचे एम.फिल.पूर्ण झाले.आजतागायत
पी.एच.डी प्राप्त आघाडीचे साहित्यिक -डॉ.म.सु.पगारे,डॉ.उषा सावंत,डॉ.प्रतिमा
जगताप,डॉ.वासुदेव वले,तावडी लेखनाचे प्रवर्तक प्रथितयश लेखक डॉ.अशोक कौतीक कोळी,डॉ.रविंद्र माळी,डॉ.सत्यजित साळवे,डॉ.योगेश महाले तसेच एम.फिल प्राप्त आघाडीचे साहित्यिक – दिपध्वज कोसोदे,विनोद राजपूत,ताराचंद बिंदवाल,जनसंवाद व पत्रकारीता लघु शोध प्रकल्प केलेले विद्यार्थी – सरोजिनी गाजरे,रविंद्र खडसे,मनिष भंकाळे
प्रकाशित पुस्तके
एकूण – २९ पुस्तके त्यात प्रामुख्याने काव्यसंग्रह ८,समिक्षा संपादनासह ६ ,गौरवग्रंथ व स्मृतिग्रंथ ६ ,संपादित ६ आणि अन्य संशोधनपर वैचारिक ग्रंथ आहेत.
पदाधिकारी:- व्यासंग,कठोर साधना व निर्भय अन् समर्पित नेतृत्व यामुळे पुढील पदांवर सरांनी काम करून साहित्य प्रातांत अमिट नाममुद्रा उमटविली.
- म.सा.पत्रिका संपादक मंडळ माजी कार्यकारी सदस्य म.सा.प.पुणे * माजी सदस्य अ.भा.मराठी साहित्य महामंडळ * कार्याध्यक्ष म.सा.प.जळगाव * माजी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ( कला आणि भाषा विद्या शाखा ) * उपाध्यक्ष , मराठी बोली साहित्य संघ नागपुर * कार्यकारी सदस्य उत्तर महाराष्ट्र साहित्य सभा नाशिक,सदस्य,मु.जे.महाविद्यालय,जळगाव ( स्थानिक व्यवस्थापन समिती )
अभ्यासक :- - सर्जनशील लेखक,कवी,समीक्षक आणि संशोधक,मार्गदर्शक चित्रकार * मराठी साहित्य आणि भाषा समीक्षेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व * चित्रकला,
कलेचा इतिहास सौंदर्यशास्त्र,लोकसाहित्य,लोककला आणि संत साहित्याच्या अभ्यासात जनसंवाद माध्यमे आणि पत्रकारिता मार्गदर्शक त्याशिवाय शेकडो नवोदित लेखकांच्या साहित्यकृतींना अभ्यासपूर्ण प्रस्तावना देऊन प्रोत्साहन तथा पाठराखण सरांनी केली आहे.
टि.डब्ल्यू.जे.फौउंडेशन चिपळूण संस्था ग्रंथदान योजनेत मिळालेली पुस्तके दुर्गम भागाच्या गावातील नागरिकांसाठी आणि शाळेसाठी मोफत उपलब्ध करून मराठी वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करण्यासाठी अभिनव उपक्रम निरंतरपणे राबवित असते.पुस्तक प्रदर्शनातून जास्तीत जास्त ग्रंथप्रेमींपर्यंत पोहोचण्याचा भगीरथ प्रयत्न संस्था करते मराठी पुस्तकांचा खजिना आपल्या दारी भावार्थ व्हॅन घेऊन येते. व्हॅन शाळा,कार्यालये,रुग्णालये इत्यादींना उपयुक्त असा ‘ भावार्थ कॉर्नर ‘ सशुल्क उपक्रम मागणीनुसार उपलब्ध करून देते.विनंतीला मान देऊन भावार्थ मोफत वाचनालयासाठी पिताश्री डॉ.किसन पाटील लिखित दर्जेदार पुस्तकांची भरघोस ग्रंथभेट दिल्याबद्दल डॉक्टर मयूर पाटील सरांचे विजय लुल्हे यांनी व्यक्तिशः कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.

