उज्जैनकर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान
![]()

उज्जैनकर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावच्या पदाधिकाऱ्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर काही जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवड करण्यात आली निवड पूर्वी झालेल्या झूम मीटिंग द्वारेच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केलेली होती त्या पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सिंधी कॉलनी जळगाव येथे आयोजित मीटिंगमध्ये नुकतेच मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर होते याप्रसंगी राज्य महिला संघटक प्रा. डॉ. मोहिनी उपासनी जळगाव जिल्हा महिला संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे, समन्वयक प्रा. संध्या महाजन जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री किशोर पाटील जळगाव जिल्हा विधी सल्लागार श्री मधुकरराव शुरपाटणे जिल्हा महिला खजिनदार सौ. वैशाली नरेंद्र दैवज्ञ जिल्हा सदस्य म्हणून श्री किशोर नेवे श्री प्रकाश पाटील श्री अजय कुमार पाटील आदींना निवड पत्र प्रदान करून गौरवण्यात आले तर यापूर्वी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनोहरराव रोकडे साहेब व जिल्हा सल्लागार श्री एन. जी. शेजोळे साहेब यांना सुद्धा निवड पत्र देऊन गौरवलेले आहे. याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष श्री किशोर पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले त्यामध्ये त्यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे विविध उपक्रमाची माहिती दिली याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उज्जैनकर फाउंडेशनच्या विविध उपक्रमात हिरीरीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या व फाउंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली आपले फाउंडेशन महाराष्ट्र मध्ये व राज्याच्या बाहेर सुद्धा काम करत आहे विविध जिल्ह्यातील व राज्यातील पदाधिकारी जुळत आहेत यासाठी त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले नुकतेच उज्जैनकर यांनी बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यातील नवीन सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन गौरवलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री किशोर पाटील यांनी केले.

