1 min read

कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणा
विरोधात शिक्षकांचे सोमवारी निर्दशने

Loading

कंत्राटीकरण व शाळांच्या खाजगीकरणा
विरोधात शिक्षकांचे सोमवारी निर्दशने

जिल्हा परिषद जळगाव येथे होणार निदर्शने व शासन निर्णयाची होळी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शासनाच्या खाजगीकरण व शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात  शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक (जिल्हा परिषद, जळगाव) यांचे कार्यालयासमोर सोमवार दिनांक १६/१०/२०२३ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत  शासन निर्णयांच्या विरोधात निदर्शने करणार असून या शासन निर्णयांची होळी करणार आहोत असे माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व शिक्षक संघाचे सेक्रटरी शालीग्राम भिरूड यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
             आंदोलनानंतर मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र राज्य यांना शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निवेदन देण्यात येणार आहे. सदर आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या व मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जे.के.पाटील, सुनिल भिरुड, एस्.. डी. भिरुड.. एच्. जी. इंगळे, यु.यु.दादा पाटील, आर. एच्. बाविस्कर, संभाजीराव पाटील, सी.सी. वाणी, आर. आर. पाटील, साधना लोखंडे, पुष्पा पाटील,नंदन वळींकर, सुनिल सोनार, सुनिल गरुड, शैलेश राणे, एस्. एन्. पाटील, बी.डी.महाले, एन्. ओ. चौधरी, अरुण सपकाळे, योगेश भोईटे, संदिप डोलारे, डिगंबर पाटील, डी.ए.पाटील, प्रदिप साखरे, संजय निकम,जे.पी.सपकाळे,  राजेश जाधव, आर. आर. धनगर, एस्. एस्. अहिरे, सिध्देश्वर वाघुळदे, यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *