1 min read

धानोरा येथे जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी दिली भेट.

Loading

धानोरा येथे जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी दिली भेट.
धानोरा ता.चोपडा-
राज्य क्षयरोग कार्यालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव जिल्ह्यात, दिनांक ३ ऑक्टोबर ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असून,
दैनंदिन होत असलेल्या सर्वेक्षण पडताळणी करिता राज्यस्तरावरून डॉ.नितीन भालेराव सहाय्यक सहसंचालक, आरोग्य सेवा, क्षयरोग व कुष्ठरोग, पुणे तसेच जिल्हा स्तरावरून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा तसेच चोपडा येथे भेट दिली.
या भेटीत त्यांनी प्रत्यक्ष भागात जाऊन, गृहभेट देऊन, आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण केलेल्या कामाची पडताळणी करून, समाधान व्यक्त केले, तसेच कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा PPM समन्वयक किरण निकम, जिल्हा SDPS विलास पाटील, तसेच तालुका स्तरावरून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक-किशोर सैंदाणे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक-प्रमोद पाटील, TBHV-कमलेश बडगुजर तसेच धानोरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा सेविका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *