1 min read

समर्थ गावकरीचे संपादक,डॉ. विश्वास आरोटे यांची सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड!

Loading

समर्थ गावकरीचे संपादक,डॉ. विश्वास आरोटे यांची सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड!

अकोले.दि.११ ( मनिलाल शिंपी )
अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी चे संपादक व A v p news वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. विश्वास आरोटे यांची नुकतीच वार्षिक सभेत सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली, त्यानंतर त्यांना निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष- श्री. उत्तम कानवडे, उपाध्यक्ष – डॉ. जनार्दन मोरे, संचालक सूर्यभान नाईकवाडी, हेमंतकुमार धुमाळ, सचिन शिंदे ,अशोक कुमार शिंदे, सुभाष वाळुंज, चंदू मोरे, भागवत बाळासाहेब, व आदी पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालक पदी सुभाष वाळुंज, चंदू मोरे, बाळासाहेब भागवत यांची बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली तर तज्ञ संचालक पदी नंदकुमार कासार यांची तर स्वीकृत संचालक पदी रामनाथ कानवडे नारायण जोंधळे यांची यावेळी निवड करण्यात आली, संस्थेच्या ठेवी एक कोटी तीन लाख रुपये असून कर्ज वितरण 67६७ लाख ९४ हजार ७७४ तर गुंतवणूक ३५ लाख १५ हजार तर संस्थेकडे खेळते भाग भांडवल १ कोटी १२ लाख १३ हजार ३८६ तर संस्थेला यावर्षी नफा १ लाख ७१ हजार ४५१ रुपये नफा प्राप्त झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कानवडे व उपाध्यक्ष डॉक्टर जनार्दन मोरे यांनी दिली … यावेळी… जनरल मॅनेजर सचिन पवार सह व्यवस्थापक चंद्रकांत देशमुख. सचिन पवार आदी उपस्थित होते… नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
तसेच तज्ञ संचालक हरिभक्त पारायण डॉ.श्री.विश्वास आरोटे
यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाचे सचिव डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांच्यावतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *