1 min read

कळमसरे येथील विजय व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी द्या,मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांची मागणी…

Loading

कळमसरे येथील विजय व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी द्या,मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांची मागणी…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कळमसरे येथील विजय व्यायम शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत मागणी केली.
सविस्तर माहिती अशी कि सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे व त्यांचे सहकारी बांधव यांनी कळमसरे येथे आकर्षक गणपती मंदिर भाविकांसाठी बांधले आहे. दिपावलीच्या वेळी माजी सभापती सौ अनिता मराठे व सामाजिक कार्यकर्ते हरिष मराठे गोरगरिबांना दिपावलीचा फराळ वाटप करतात. कळमसरे येथील तरुणांना व्यायमशाळेची गरज आहे. ही गरज ओळखून आदरणीय आमचे तालुका व राज्यचे मंत्री अनिल भाईदास पाटील अमळनेर यांना कळमसरे येथील विजय व्यायाम शाळा साठी बांधकाम साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे लेखी निवेदन व्यायम शाळेचे अध्यक्ष हरिष परशराम मराठे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *