मुंबईतील खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतरांचे सुपर सॅलरी बँक खाते सुरू — खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
![]()

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना (मुंबई विभाग)
मुंबईतील खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतरांचे सुपर सॅलरी बँक खाते सुरू — खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
मुंबईतील दक्षिण , पश्चिम व उत्तर विभागातील अनुदानित खाजगी शाळातील शिक्षकांनी युनियन बँकेत सुपर सॅलरी खाते सुरू करावे – ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष)
मुंबईतील उत्तर , दक्षिण व पश्चिम विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार खाते युनियन बँकेत असून सुद्धा बँकेकडून सुपर सॅलरी अकाउंट बद्दल कोणत्याही सुविधा शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना दिल्या जात नाहीत. तसेच वेगवेगळे छुपे चार्जेस लावले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत सखोल माहिती घेतली असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व संघटनेच्या पाठपुराव्यानुसार सीएसटी येथील बाजार गेट स्ट्रीट ब्रांच ( नोडल ब्रांच ) अधिकारी श्रीराम कुमार यांच्याशी संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून सुपर सॅलरी सुरू करण्याबाबत यशस्वी चर्चा झाली. प्रॉपर क्लासिफिकेशन ऑफ मुंबई टीचर्स सॅलरी अकाउंट नुसार मुंबईतील सर्व युनियन बँकेच्या शाखांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे. शिक्षकांच्या सुपर सॅलरी अकाउंट बाबत सर्व शाखांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
💥सुपर सॅलरी खात्याचे फायदे :-💥
◼️विशेष खाते फायदे :- मासिक पगाराच्या 90% पर्यंत तात्पुरती ओव्हरड्राफ्ट ( ओडी )सुविधा , नि:शुल्क डेबिट कार्ड , कौटुंबिक बँकिंग कार्यक्रमांतर्गत तीन सदस्यांना लाभ.
◼️वैयक्तिक संरक्षण फायदे :- 52 लाख रुपये पर्यंतचे अपघाती विमा संरक्षण , प्रतिवर्षी पंधरा हजार रुपयांपर्यंतचे मोफत हॉस्पिटल कॅशलेस मेडिक्लेम.
◼️मानार्थ बँकिंग विशेष अधिकार :- स्वस्त दरात बँक लॉकर सुविधा उपलब्ध , किरकोळ कर्जावरील सवलतीत आरओआय आणि प्रक्रिया शुल्क माफी.
◼️व्यवहाराचे फायदे :- एटीएम / पीओएस व्यवहारांसाठी उच्च मूल्य मर्यादा , मोफत अमर्यादित एटीएम व्यवहार , अमर्यादित आरटीजीएस / आयपीएस सुविधा.
◼️जाता जाता बँकिंग :- यु एन एक्स टी द्वारे आधुनिक बँकिंग अपग्रेड करण्यासाठी एक व्यापक मोबाईल आणि प्रयोग , एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक नि:शुल्क सेवा इत्यादी.
यांसह अनेक सेवा सुविधा मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर कदम व मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांनी पाठपुरवठ्यांस अथक मेहनत घेतली.
आपणा सर्वांना नम्र आवाहन करण्यात येते की , सुपर सॅलरी अकाउंट सुरू करण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती करून शाळेच्या लेटरहेडवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे , अकाउंट नंबर , ग्रॉस सॅलरी अमाऊंट या माहिती पत्रासोबत प्रत्येक कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लिप बँक शाखेत जमा करून सुपर सॅलरी अकाउंट सुरू करून त्याचे लाभ घ्यावे. ही नम्र विनंती.
🙏आपला स्नेहांकित 🙏
- ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.
◼️सोबत:- माहिती पत्रक (pdf) जोडले आहे.


🔹अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा :-📞
मनोहर कदम ( 8691089891 )
दत्तात्रय शेंडकर ( 9082727004 )
भानुदास शिंदे (9769457141 )
डाॅ. डी.डी. आंबोलगेकर ( 9987794705 )
प्रा. वसंत भागवत ( 9892507204 )
प्रभाकर कांबळे ( 9792986772 )
अनिल चिकणे ( 9022626244 )
सुधिर वर्हाडी ( 9594932455 )
जयंत सुर्यवंशी ( 9221607795 )
श्रीराम श्रीवर्धनकर ( 8976123282 )
गणेश झगडे ( 8691848713 )
मिलिंद जाधव ( 9082013907 )
राहुल जाधव ( 8850306907 )
संजय वाघ ( 9869237401 )

